Ads

Friday, May 14, 2021

सचिन तेंडुलकरमुळे या गोलंदाजाचे करिअर संपले, पाहा Video

मुंबई: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात काही अशा मालिका आहेत ज्या चाहत्यांच्या मनात आज देखील कामय आहेत. यात मग शारजाह कपमधील मॅच असो की २०११चा वर्ल्डकप असे अनेक क्षण आहेत ज्यांनी भारतीय चाहत्यांना आनंद दिला. अशीच एक मालिका १९९७ साली झाली होती. वाचा- पेप्सी इंडिपेंडेंस कपमध्ये अशीच एक लढत आजच्या दिवशी २४ वर्षापूर्वी १४ मे रोजी झाली होती. आजच्या दिवशी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एक सामना झाला होता. या सामन्यात सचिन तेंडुलकरने एका गोलंदाजीची अशी धुलाई केली की तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा दिसला नाही. वाचा- न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतापुढे २२१ धावांचे लक्ष्य दिले होते. या सामन्यात सचिन तेंडुलकरने न्यूझीलंडच्या हीथ डेव्हिस याची अशी धुलाई केली की त्याचे करिअर जवळपास संपले. कारण डेव्हिसची ही अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच ठरली. त्याने करिअरमध्ये ५ कसोटी आणि ११ वनडे लढती खेळल्या. वाचा- बेंगळुरू येथे झालेल्या या सामन्यात सचिनने हीथ डेव्हिसच्या एका षटकात ३ चौकार आणि १ षटकार मारला. हीथने या सामन्यात ५ षटकात ५४ धावा दिल्या. यात चार वाइड आणि चार नो बॉलचा समावेश होता. सचिनच्या या फलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eK4vw8

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...