नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार न्यूझीलंडविरुद्ध पुढील महिन्यात आयसीसी फायनलमध्ये जेव्हा मैदानावर उतरेल तेव्हा एक इतिहास घडवेल. या सामन्यात विराट कोहली भारताकडून सर्वाधिक कसोटी सामन्यात नेतृत्व करणारा खेळाडू ठरले. त्याच बरोबर न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवल्यास तो जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचेल. वाचा- विराटने आतापर्यंत ६० कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे आणि माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. इंग्लंडविरुद्ध १८ जून पासून सुरू होणाऱ्या लढतीत विराट मैदानावर उतरताच भारताकडून सर्वाधिक कसोटीत नेतृत्व करण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा होईल. वाचा- विराटने या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी मालिकेत धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. त्याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन कसोटी मुलीच्या जन्मामुळे तो खेळला नव्हता. २०१४ साली विराटने कसोटी संघाचे नेतृत्व हाती घेतली. आतापर्यंत त्याने ६० सामन्यात कर्णधार म्हणून भूमिका पार पाडली आहे. या ६० पैकी ३६ मध्ये विजय मिळवाल आहे. हा देखील एक विक्रम आहे. धोनीने ६० पैकी २७ लढतीत विजय मिळवला होता. वाचा- दोन जून रोजी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप नंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका होणार आहे. या संपूर्ण साडे तीन महिन्यांच्या दौऱ्यात विराटने एक विजय मिळवल्यास तो कसोटीत सर्वाधिक विजय मिळवणारा जगातील चौथ्या क्रमांकाचा कर्णधार ठरले. या बाबत विराटला वेस्ट इंडिजचे महान कर्णधार क्लाइव्ह लॉयड यांना मागे टाकू शकतो. वाचा- लॉयड यांनी ७४ पैकी ३६ कसोटीत विजय मिळवला होता. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ १०९ पैकी ५३ विजयासह पहिल्या, ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग ७७ पैकी ४८ विजयासह दुसऱ्या आणि स्टीव वॉ ५७ पैकी ४१ विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे. ग्रॅमी स्मिथच्या नावावर सर्वाधिक कसोटी सामन्यात नेतृत्व करण्याचा विक्रम आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे एलन बॉर्डर (९३ सामने), स्टीफन फ्लेमिंग (८०), पॉन्टिंग (७७), लॉयड (७४) आणि मग धोनी आणि विराट यांचा क्रमांक लागतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Se89Wp
No comments:
Post a Comment