Ads

Showing posts with label Latest Maharashtra News in Marathi. Show all posts
Showing posts with label Latest Maharashtra News in Marathi. Show all posts

Monday, July 30, 2018

पुणे: चाकणमध्ये २५ बसेस पेटवल्या; अश्रुधुराचा मारा

मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलकांनी चाकणमध्ये काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. आक्रमक मोर्चेकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरतानाच मिळेल त्या बसेसवर दगडफेक करत बसेसची जाळपोळ केल्याने पोलिसांना आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा करावा लागला. त्यामुळे चाकणमध्ये प्रचंड तणाव पसरला असून ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2M0Opxm

काहीही करा, मराठा समाजाला आरक्षण द्या: उद्धव

आरक्षणासाठी मराठा आंदोलकांनी राज्यभरात हिंसक आंदोलने सुरू केली आहेत. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची जोरदार मागणी केली आहे. 'राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता मराठा समाजाला आरक्षण द्या. काहीही करा, पण मराठा समाजाला आरक्षण द्या,' अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2LLAazU

सोलापूर बंदला हिंसक वळण; जमावावर पोलिसांचा लाठीमार

मराठा आरक्षणासाठी आज पुकारण्यात आलेल्या सोलापूर बंदला हिंसक वळण लागलंय. सोलापुरात कडकडीत बंद सुरू असताना जमावाने पोलीस उपायुक्तांच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली. त्यानंतर या जमावाने पोलिसांवरही दगडफेक सुरू केल्याने पोलिसांनी या जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला. त्यामुळे आंदोलक आणखीनच आक्रमक झाल्याने या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली असून त्यामुळे सोलापुरात तणाव निर्माण झाला आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2NUPCa3

'फेसबुक' पोस्ट लिहून तरुणाची आत्महत्या

फेसबुकवर पोस्ट टाकून एका तरुणाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मराठा आरक्षणसाठी त्याने आत्महत्या केल्याचं बोललं जात असून या घटनेमुळे औरंगाबादमध्ये खळबळ उडाली आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2AklDq9

मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान एक प्रवासी ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात प्लॅटफॉर्मवरून लोकलखाली आल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. हा प्रवासी गंभीर जखमी आहे. या अपघातामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. ऐन गर्दीच्या वेळी लोकलच्या विलंबामुळे प्रवासी त्रस्त आहेत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Os1ilK

Sunday, July 29, 2018

सातशे वाघांवर विकास प्रकल्पांचा परिणाम

येत्या काळात मध्य भारतातील आठ राज्यांमध्ये तब्बल ३९९ विकास प्रकल्प आकारास येणार असून, त्यांचा थेट परिणाम सुमारे ७०० वाघांच्या अधिवासावर होणार आहे, असा निष्कर्ष 'वाइल्डलाइफ काँझर्व्हेशन ट्रस्ट' या वन्यजीव क्षेत्रातील प्रख्यात संस्थेने केलेल्या अभ्यासातून मांडण्यात आला आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2mTYy4g

हमीभावाच्या दराचा हिशेब नंतरही शक्य

म टा प्रतिनिधी, पुणे'आतापर्यंत शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरण होते...

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2K744JR

सामाजिक मागासलेपण हाच आरक्षणाचा निकष

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गांभीर्याने चर्चाच होत नाही. राज्य सरकारने पॉप्युलर विधाने करण्यापेक्षा आपली याबाबतची ठोस भूमिका स्पष्ट करावी. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीही केवळ घटनेमध्ये दुरुस्ती करायला हवी, असे म्हणण्यापेक्षा त्याचा मसुदा सादर करावा; अन्यथा त्यांचे विधान हे मराठा समाजाला खूश करण्यासाठी आहे, असा सरळ अर्थ निघेल.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2AwijZp

मराठा आरक्षणासाठी ९ ऑगस्टपासून एल्गार

रविवारी मुख्यमंत्र्यासोबत मुंबईत चर्चा करण्यासाठी गेलेल्या समन्वयकांचा आमचा कांही संबंध नाही असे घोषीत करुन मराठा क्रांती मोर्चोच्या लातूर इथ झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत मराठा समाजाच्या मागण्या होण्यासाठी पुढील काळातील आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यात आली.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2mTbtn6

लोकपालसाठी अण्णांचे २ ऑक्टोबरपासून आंदोलन

‘तत्कालीन सरकारच्या विरोधात लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीबाबत बोलणारे सत्तेत येऊन आता चार वर्षांपेक्षा जास्त कालावधी गेला आहे, पण ते आज लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीविषयी काहीच बोलत नाहीत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2OujP0G

पोलादपूर दुर्घटना: ३० मृतदेह बाहेर काढले; शोधकार्य संपलं

तब्बल २६ तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर पोलादपूरच्या आंबेनळी घाटातील शोधकार्य थांबलं आहे. ट्रेकर्स आणि एनडीआरएफच्या टीमने ३३ पैकी ३० जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. या ३० जणांची ओळख पटली असून इतर तीनजणांचा अद्यापही शोध लागलेला नाही. घाटात या तिघांशी संबंधित कोणताही सुगावा न लागल्याने अखेर या बचाव पथकानं त्यांचं शोधकार्य थांबवलं आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2LJc5cU

'देशाला खडड्यातून काढण्यासाठी मोदीच हवेत'

भाजपच्या 'संपर्क फॉर समर्थन' अभियानाला बॉलिवूड क्वीन, प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौटने उघडपणे पाठिंबा दिला आहे. 'देशाला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी पाच वर्ष पुरेसे नाहीत. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत. तेच पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार आहेत,' असं मत कंगनाने व्यक्त केलं आहे. मात्र राजकारणात प्रवेश करण्याबाबतच्या प्रश्नावर तिने सूचक मौन पाळलं.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2NSGYc9

Saturday, July 28, 2018

आगीत तेल ओतले: शरद पवार

'शंभर दिवसांत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिलेल्या राज्यातील भाजप सरकारने चार वर्षे झाली तरी काहीच केले नाही, उलट आंदोलनाबाबत उलटसुलट विधाने करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आगीत तेल ओतले, यामुळेच आंदोलन चिघळले,' अशी टीका माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत केली.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2uXGfPR

प्रेमसंबंध उघड होण्याच्या भीतीने हर्षची हत्या

उल्हासनगर येथे गेल्या आठवड्यात ११ वर्षीय हर्ष अल्हाट याची हत्या झाली होती. परिसरातील एका तरुण आणि तरुणीचे शारीरिक संबंध हर्षने पाहिल्याने, ही घटना जगजाहीर होण्याच्या भीतीने अस्लम अन्सारी (२२) या आरोपीने त्याची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2NTFXRc

फूटपाथने घेतला झाडाचा बळी

भांडारकर रस्त्यावर नव्याने करण्यात येत असलेल्या फूटपाथच्या कामासाठी पालिकेने झाडाचा बळी घेतला आहे. या रस्त्यावरील फूटपाथची रुंदी वाढविण्यासाठी संबधित ठेकेदाराने अडथळा ठरणाऱ्या झाडांची मुळे तोडण्याचा 'प्रताप' करण्यात आला आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2vhQSN4

सिंगापूरने जोपासली भारतीय परंपरा

'नेतृत्वगुणांच्या जगात दोन परंपरा बघायला मिळतात. एक पाश्चात्य परंपरा सुख देणारी आहे, तर भारतीय परंपरेत स्वत:चा विचार न करता दुसऱ्यांना मोठे करणारी, लक्ष्मीला आकर्षित करायला सांगणाऱ्या नेतृत्वाचा वेगळा दृष्टीकोन सांगितलेला आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2uYKbQy

‘शिवशाही’त मनस्तापच अधिक

म टा...

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2LYfiSP

पोलादपूर अपघातानंतर रत्नागिरीवर शोककळा

पोलादपूर येथील आंबेनळी घाटातील दरीत बस कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३३ जण ठार झाले आहेत. या अपघातामुळे रत्नागिरीवर शोककळा पसरली असून दापोलीत व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद ठेवून शोक व्यक्त केला आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2NQRroA

पिकनिकला निघालेल्या कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळली

महाबळेश्वरला पिकनिकसाठी काही कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेली एक बस पोलादपूर घाटातील दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३३ जण ठार झाले आहेत. सुमारे ५०० फूट खोल दरीत ही बस कोसळली असून बसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे ४० कर्मचारी होते. या घटनेची माहिती मिळताच सर्वच यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2vkmBNF

देशभरातील तीन लाख डॉक्टरांचा संप सुरू

केंद्र सरकारने आणलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला विरोध करण्यासाठी देशभरातील खासगी डॉक्टर आज एक दिवसाच्या संपावर गेले आहेत. पहाटे ६ वाजल्यापासून हा संप सुरू झाला असून सायंकाळी ६ वाजता हा संप मिटणार आहे. मात्र अत्यावश्यक रुग्णासेवा सुरू ठेवण्यात आल्या असल्या तरी इतर रुग्ण सेवेवर या संपाचा परिणाम होताना दिसत आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2LxT9Pb

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...