नवी दिल्ली : एबी डिव्हिलियर्सचे () जगभरात क्रिकेट चाहते आहेत. पण आता डिव्हिलियर्सबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. डिव्हिलियर्स आता यापुढे क्रिकेट खेळणार की नाही, याबाबतचा मोठा खुलासा आता समोर आला आहे. डिव्हिलियर्स हा भन्नाट फॉर्मात होता, आयपीएलमध्ये त्याने धडाकेबाज फलंदाजी केली होती. त्यानंतर डिव्हिलियर्स हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून खेळणार असल्याचे म्हटले जात होते. काही महिन्यांमध्येच ट्वेन्टी-२० विश्वचषक आहे आणि या स्पर्धे डिव्हिलियर्स खेळणार असल्याचे त्याच्या चाहत्यांना वाटत होते. पण आता या चाहत्यांना एक मोठा धक्का बसला आहे. डिव्हिलियर्सबाबत एक मोठा निर्णय आता दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने घेतला आहे. त्यानुसार डिव्हिलियर्स आता देशाकडून कोणताही सामना खेळू शकणार नाही. कारण डिव्हिलियर्सने एकदा घेतलेली निवृत्ती हीच अंतिम राहील, असे क्रिकेट मंडळाकडून सांगण्यात आले आहे. क्रिकेट मंडळाने यावेळी डिव्हिलियर्सबरोबर संपर्क साधल्याचेही म्हटले जात आहे. यावेळी डिव्हिलियर्स आणि क्रिकेट मंडळात संवाद झाला आणि त्यानंतर हा निर्णय घेतल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे डिव्हिलियर्स हा देशाकडून खेळताना दिसणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2RXPcXT
No comments:
Post a Comment