
सिडनी: २०१८ साली झालेल्या बॉल टॅम्परिंगबद्दल ऑस्ट्रेलिया संघातील अन्य खेळाडूंना माहिती होती असे वक्तव्य करून चर्चेत आलेला कॅमेरून बॅनक्रॉफ्टने आता मात्र यु टर्न घेतला आहे. एका वृत्तपत्राला त्याने दिलेल्या मुलाखतीनंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्याशी संपर्क केला होता. वाचा- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळताना झालेल्या प्रकरणात तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट यांना दोषी ठरवण्यात आले होते. स्मिथ आणि वॉर्नर यांना पदावरून काढून टाकले तसेच एक वर्षाची बंदी घातली. बॅनक्रॉफ्टलवर नऊ महिन्यांची बंदी घातली गेली होती. वाचा- सध्या इंग्लंडमध्ये काउंटी खेळणाऱ्या बॅनक्रॉफ्टने बॉल टॅम्परिंगची गोलंदाजांना देखील कल्पना होती असे वक्तव्य केल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्याशी संपर्क केला. पण या प्रकरणी माझ्याकडे काही माहिती नसल्याचे त्याने सांगितले. वाचा- सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या समितीने त्याच्याशी संपर्क केला होता. पण त्याने कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. बॅनक्रॉफ्टने सोमवारी रात्री माझ्याकडे २०१८साली झालेल्या बॉल टॅम्परिंगबद्दल सांगण्यासारखे काही नाही. या प्रकरणी आधी झालेल्या चौकशीचे मी समर्थन करतो आणि त्यापासून मी समाधानी देखील आहे. वाचा- बॅनक्रॉफ्टने सीएला दिलेल्या ताज्या माहितीमुळे आता हे प्रकरण पुढे वाढण्याची शक्यता नसल्याचे सिडनी मॉर्निंग डेराल्डने म्हटले आहे. त्या घटनेची सखोल चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर देखील कोणाकडे अधिक काही माहिती असेल तर त्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या समितीशी संपर्क करावा, असे सीएच्या राष्ट्रीय संघाचे प्रमुख बेन ऑलिव्हर रे यांनी सांगितले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ym6fDC
No comments:
Post a Comment