Ads

Monday, February 3, 2020

राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची चूक; ICCने केला दंड!

माउंट माउंगनुई: यजमान न्यूझीलंडचा पाचव्या आणि अंतिम टी-२० सामन्यात पराभव करून भारतीय संघाने मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवले. भारतीय संघाचे कौतुक फक्त देशातील चाहते नाही तर जगभरातून केले जात आहे. न्यूझीलंड भूमीवर ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मात्र दंड केला आहे. माउंट माउंगनुई येथील बे ओव्हल मैदानात झालेल्या पाचव्या टी-२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर १६४ धावांचे आव्हान दिले होते. पण न्यूझीलंडला १५९ धावांपर्यंत मजल मारता आली. न्यूझीलंडविरुद्ध गोलंदाजी करताना भारताने धीम्या गतीने गोलंदाजी केली. यासाठी आयसीसीने २० टक्के दंड केला. रोहित शर्माला दुखापत झाल्यामुळे तो क्षेत्ररक्षणासाठी आला नाही. त्याच्या ऐवजी केएल राहुल याने कर्णधार म्हणून जबाबदारी स्विकारली. पण राहुलला निर्धारित वेळेत २० ओव्हर पूर्ण करता आल्या नाहीत. त्यामुळे आयसीसीने संघातील सर्व खेळाडूंना त्यांच्या मानधनाच्या २० टक्के इतका दंड केला. वाचा- न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल भारतीय संघाला दंड होण्याची ही दुसरी वेळ आहे. वेलिंग्टन येथे झालेल्या सामन्यात देखील भारताने धीम्या गतीने षटके टाकली होती. तेव्हा विराट कोहली कर्णधार होता. त्या सामन्यात आयसीसीने ४० टक्के इतका दंड केला होता. वाचा- आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉडने संघाला २० टक्के दंड केला. भारतीय संघाने नियम २.२२ चे उल्लंघन केले आहे. हा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धीम्या गतीने गोलंदाजी करण्यासंदर्भातील आहे. या नियमानुसार प्रत्येक ओव्हर मागे खेळाडूंच्या मानधनातून २० टक्के रक्कम दंड म्हणून आकारला जातो, असे आयसीसीने म्हटले आहे. कर्णधार रोहित शर्माने चुक मान्य केली असून या प्रकरणी कोणतीही सुनावणी होणार नाही. हे देखील वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/31lQPiB

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...