नवी दिल्ली : भारताचा श्रीलंकेचा दौरा आता संकटात आला आहे. कारण भारताचा हा दौरा आता रद्द होऊ शकतो, असे दिसत आहे. हा दौरा रद्द होण्यासाठी आता एक मोठी गोष्ट समोर आली आहे. भारताचा श्रीलंकेचा दौरा हा जुलै महिन्यात होणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांत तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. पण हा दौरा आता रद्द होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. कारण श्रीलंकेमध्ये जून महिन्यात आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा शक्य नसल्याचे श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळए जर जून महिन्यातील स्पर्धा रद्द होऊ शकते, तर त्यानंतच्या महिन्यातील भारताचा दौराही रद्द होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. पण याबाबतचा अधिकृत निर्णय अजूनही झालेला नाही. श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने आशिया चषक स्पर्धा खेळवणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर श्रीलंकेमध्ये विमानबंदीही आहे. त्यामुळे बाहेरच्या देशातून कोणतेही विमान किंवा प्रवासी आता श्रीलंकेत जाऊ शकत नाहीत. सातत्याने करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले होते. त्यामुळे जर जून महिन्यातील आशिया चषक रद्द होऊ शकतो तर जुलै महिन्यात भारताचा दौरा यशस्वीपणे कसा खेळवला जाऊ शकतो, असा सवाल आता विचारला जात आहे. त्यामुळे भारताचा श्रीलंकेचा दौरा सध्याच्या घडीला अडचणीत आला आहे. आशिया चषक स्पर्धा गेल्यावर्षी ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होती. पण त्यानंतर या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेला देण्यात आले होते. पण श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही स्पर्धा खेळवणे संभव नसल्याचे सांगितले आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळातील मुख्य कार्यकारी अधिकारी अॅश्ले डीसिल्व्हा यांनी यावेळी सांगितले की, " सध्याच्या घडीला करोनामुळे भयावह स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यावर्षी आशिया चषक स्पर्धा खेळवणे योग्य ठरणार नाही. आता या स्पर्धेचे आयोजन २०२३ साली होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकानंतर होऊ शकते. कारण यापुढील दोन वर्षे सर्व देशांचे कार्यक्रम व्यस्त आहेत."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3v6aa5I
No comments:
Post a Comment