नवी दिल्ली: भारताचा माजी ऑलराउंडर क्रिकेटपटू हा त्याची पत्नी सफा बेगच्या एका फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इरफानचा मुलगा इमरानच्या इस्टाग्रामवर एक फोटो शेअर करण्यात आला होता. ज्यात इरफान, त्याचा मुलगा आणि पत्नी दिसते. वाचा- इमरानच्या इस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या फोटोत सफा बेगचा चेहरा ब्लर करण्यात आला आहे. यावरून अनेकांनी इरफानला ट्रोल करण्यात आले. इरफानने देखील ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. संबंधित फोटो तिच्या पत्नीने मुलाच्या अकाउंटवरून शेअर केला होता. तसेच तो फोटो तिनेच ब्लर केलाय. मी तिचा जीवनसाधी आहे मालक नाही. वाचा- वाचा- इरफान पठाण नेहमी पत्नी सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. पण या फोटोत पत्नी कायम चेहरा लपवते. सफाच्या चेहऱ्यावर बुर्का असते किंवा ती हाताने चेहरा लपवते. चेहरा न दाखवण्याचा तिचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. वाचा- सफा आणि इरफान यांचा विवाह फेब्रुवारी २०१६ मध्ये मक्का येथे झाला होता. हा विवाह देखील हाय प्रोफाइल होता आणि अतिशय गुप्तपणे पार पाडला होता. विवाहात काही जवळचे नातेवाइक आणि मित्र उपस्थित होते. सफाचे वडील मिर्जा फारूख बेग सौदी अरेबियामधील उद्योगपती आहेत. सफा आणि इरफानची पहिली भेट दुबईमध्ये झाली होती. वाचा- वाचा- सफाचा जन्म २८ फेब्रुवारी १९९४ रोजी झाला. ती सौदी अरबच्या जेद्दा शहरात मोठी झाली आणि इंटरनॅशनल इंडियन स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. सफा मध्य पूर्व आशियातील प्रसिद्ध मॉडल होती. अनेक मोठ्या मासिकांवर तिचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. पण लग्नानंतर सफाने स्वत:चे आयुष्य खासगीच ठेवले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2SvvenL
No comments:
Post a Comment