लंडन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. ही लढत १८ जून रोजी इंग्लंडमधील साउथहॅप्टन येथे होणार असून त्यासाठी काही प्रमाणात प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. वाचा- आयसीसी आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने ४ हजार प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्याचे ठरवले आहे. यासाठी तिकीट विक्री देखील सुरू झाली आहे. या सामन्यासाठी प्रेक्षकांच्यात उत्सुकता वाढली आहे. तिकिटाची मागणी प्रत्येक दिवशी वाढत चालली आहे. आयसीसीच्या माध्यमातून काही तिकीटी प्रेक्षकांसाठी उपलब्ध होतात. अशा पद्धतीने तिकिटे मिळवण्याची प्रक्रिया १३ मे रोजी बंद झाली आहे. यातून काही लकी चाहत्यांना तिकीटे मिळाली आहेत. बाकी तिकीटे आयसीसी अधिकृत तिकिट आणि ट्रॅव्हल एजंटकडून विकले जातात. वाचा- यासंदर्भात एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार चाहत्यांमध्ये या सामन्याच्या तिकिटाची क्रेझ इतकी आहे की ते दोन लाख रुपयांना तिकिट घेण्यास तयार आहेत. आयसीसीने नियुक्त केलेल्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तिकिटसाठीची मागणी वाढली आहे. किमत आणखी वाढण्याची शक्यता आहे. वाचा- फायनल मॅचसाठी भारतीय संघ २ जून रोजी इंग्लंडसाठी रवाना होईल. भारतीय संघ सध्या मुंबईतील हॉटेलमध्ये क्वारंटाइन आहे. तर न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंडमध्ये असून ते भारताविरुद्धच्या लढती आधी इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. भारतीय संघ WTC फायनलनंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका ४ ऑगस्ट रोजी सुरू होईल तर १४ सप्टेंबरला मालिका संपेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fSLFlS
No comments:
Post a Comment