नवी दिल्ली : वृद्धिमान साहाला आयपीएल खेळत असताना करोना झाला होता. साहावर उपचार सुरु होते आणि तो आता यामधून बाहेर पडला आहे. पण जर साहा क्रिकेट खेळण्यासाठी अनफिट असेल तर भारताच्या संघात युवा विकेटकिपरला संधी मिळू शकते. हा युवा विकेटकिपर भारतीय संघाबरोबर क्वारंटाइनही झालेला आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली होती. यामध्ये रिषभ पंत आणि साहा या दोघांनी नावं होती. पण साहा फिट झाल्यावरच त्याला या दौऱ्याला जाता येऊ शकते, असेही यावेळी सांगण्यात आले होते. त्याचबरोबर भारतीय संघात लोकेश राहुलच्या रुपात एक यष्टीरक्षक उपलब्ध आहे. राहुल आयपीएल सोडून उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. पण आता राहुल पूर्णपणे फिट आहे. साहा जर अनफिट असेल तर आंध्रप्रदेशच्या केएस भरतला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळू शकते. भरत हा काल मुंबईमध्ये दाखल झाला आहे. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंबरोबर तो हॉटेलमध्ये क्वारंटाइन आहे. क्वारंटाइनचा कालावधी संपल्यावर भरतही भारतीय संघाबरोबर २ जूनला इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारताचा हा दौरा चार महिन्यांचा आहे. त्यामुळे या दौऱ्यात कोणीतीही जोखीम नको म्हणून भरतचा संघात समावेश करण्यात आला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3hNZrJ0
No comments:
Post a Comment