नवी दिल्ली : भारतीय संघात आता नव्याने एक युवा यष्टीरक्षक दाखल झाला आहे. या युवा यष्टीरक्षकाचे नाव आहे केएस भरत. हा भरत नेमका कोणत्या राज्यातून खेळतो आणि त्याने आतापर्यंत काय चमकदार कामगिरी केली आहे, जाणून घ्या... कोण आहे हा भरत, जाणून घ्या...केएस भरतचा जन्म हा विशाखापट्टणम येथे ३ ऑक्टोबर १९९८ या दिवशी झाला होता. स्थानिक क्रिकेटमध्ये भरतने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. भरत हा आंध्र प्रदेशकडून खेळतो. आंध्र प्रदेशकडून खेळताना भरतने आतापर्यंत त्रिशतकही झळकावले आहे. आयपीएलमध्ये भरत हा विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघातील एक सदस्य होता. यापूर्वी दिल्लीच्या संघातही त्याचा समावेश करण्यात आला होता. आतापर्यंत भरतने ७८ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या ७८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये भरतने ३७ च्या सरासरीने ४२८३ धावा केल्या आहेत. यामध्ये ९ शतकांसह २३ अर्धशतकांचाही समावेश आहे. त्यामुळे आता इंग्लंडच्या दौऱ्यात भरतला संधी मिळते का आणि त्याच्याकडून कशी कामगिरी होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असेल. भारतीय संघात चार यष्टीरक्षकांचा समावेश भारताच्या संघात आता चार यष्टीरक्षकांचा समावेश झालेला आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली होती. यामध्ये रिषभ पंत आणि साहा या दोघांनी नावं होती. पण साहा फिट झाल्यावरच त्याला या दौऱ्याला जाता येऊ शकते, असेही यावेळी सांगण्यात आले होते. त्याचबरोबर भारतीय संघात लोकेश राहुलच्या रुपात एक यष्टीरक्षक उपलब्ध आहे. राहुल आयपीएल सोडून उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. पण आता राहुल पूर्णपणे फिट आहे. साहा जर अनफिट असेल तर आंध्रप्रदेशच्या केएस भरतला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळू शकते. भरत हा काल मुंबईमध्ये दाखल झाला आहे. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंबरोबर तो हॉटेलमध्ये क्वारंटाइन आहे. त्यामुळे आता इंग्लंडच्या दौऱ्यासाठी भारतीय संघात चार यष्टीरक्षकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Scjzd4
No comments:
Post a Comment