नवी दिल्ली: भारताचा क्रिकेटपटू यांच्या आई-वडिलांना कोरना व्हायरसची लागण झाली आहे. चहलच्या वडिलांवर रुग्णालयात तर आईवर घरीच उपचार सुरू आहेत. चहलची पत्नी धनश्री वर्माने सोशल मीडियावरील एका पोस्टमधून काही दिवसांपूर्वी ही माहिती दिली होती. वाचा- चहलची पत्नी सोशल मीडियावर सक्रिय आहे. धनश्री नेहमी विविध प्रकारचे डान्स व्हिडिओ शेअर करत असते. यावेळी देखील धनश्रीने एक व्हिडिओ शेअर केला. पण युझर्सनी तिचे कौतुक करण्या ऐवजी तिला ट्रोल केले. वाचा- स्वत:चे सासू-सासरे करोनाविरुद्ध लढत असताना धनश्रीने व्हिडिओ शेअर केला. यामुळे चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले. अनेकांनी तिला या व्हिडिओवरून सुनावले देखील. वाचा- व्हिडिओमध्ये धनश्री आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची जर्सी घालून डान्स करत आहे. करोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलच्या १४व्या हंगामात चहलला खास कामगिरी करता आली नव्हती. भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यात देखील चहलची निवड करण्यात आली आही. या दौऱ्यात भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. वाचा- जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वनडे आणि टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. भारताच्या या संघात चहलची निवड होण्याची शक्यता आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wglbRZ
No comments:
Post a Comment