Ads

Thursday, May 27, 2021

IPL 2021 युएईमध्ये झाले तर टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनाला बसू शकतो धक्का

नवी दिल्ली: बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलच्या १४व्या हंगामातील उर्वरित ३१ लढती युएईमध्ये खेळवण्याचा विचार केलाय. यासंदर्भात अधिकृत घोषणा झाली नसली तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १९ किंवा २० सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएल पुन्हा सुरू होऊ शकते. बीसीसीआयच्या योजनेनुसार जर आयपीएल युएईमध्ये झाले तर कोणत्याही परिस्थितीत भारतातच आयोजित करावा लागले. युएईमध्ये फक्त ३ स्टेडियम आहेत आणि त्यावर एकापाठोपाठ एक लढती खेळवता येऊ शकणार नाहीत. वाचा- आयपीएलच्या आधी युएईमध्ये पाकिस्तान सुपर लीगच्या २० लढती होणार आहेत. जर सर्व काही नियोजनानुसार झाले तर आयपीएलच्या ३१ लढती दुबई, शारजाह आणि अबुधाबीमध्ये होतील. दोन्ही स्पर्धांच्या मिळून ५१ लढती होतील. अशात टी-२० वर्ल्डकप भारतातून युएईमध्ये शिफ्ट झाला तर आणखी ४५ सामने या मैदानावर खेळवावे लागतील. अशा पद्धतीने एकापाठोपाठ एक ९६ लढती यशस्वीपणे आयोजित करणे अशक्य आहे. वाचा- बीसीसीआयच्या नजरेत भलेही पीएसएलमधील २० लढती नसतील. पण आयपीएलमधील ३१ आणि टी-२० वर्ल्डकपमधील ४५ सामने अशा ७६ लढती फक्त तीन मैदानावर तीन महिन्यांच्या काळात आयोजित करणे देखील अवघड काम आहे. यात देखील खेळपट्टी आणि मैदानाला इतक्या लवकर तयार करण्याचे काम अवघड आहे. वाचा- इतक्या मोठ्या प्रमाणात सामने झाले तर खेळपट्टी संध होईल आणि सामन्यातील रोमांच पाहाता येणार नाही. अशी अवस्था आयपीएल २०२० मध्ये देखील झाली होती. शारजाहच्या छोट्या मैदानावरील सुरुवातीच्या लढती वगळता अन्य सामन्यात २०० पेक्षा अधिक धावसंख्या होत नव्हती. यामुळे घरातून सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांना त्यात रस वाटणार नाही. इतक नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला देखील एकाच ठिकाणी इतक्या कमी वेळेत मोठ्या प्रमाणात सामने व्हावेत असे वाटणार नाही. अशा परिस्थितीत बीसीसीआयला वर्ल्डकपचे आयोजन भारतातच करावे लागले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3i16f6j

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...