नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटपटू आर. अश्विनच्या कुटुंबियांना करोनाची लागण झाली होती. त्यासाठीच अश्विनने आयपीएल अर्ध्यावर सोडली होती आणि तो आपल्या कुटुंबियांसाठी घरी पोहोचला होता. पण या करोनाच्या काळात अश्विनकडून एक मोठी चुक झाली होती. आपली ही चुक अश्विनच्या लक्षात आली आणि त्याला जाहीर माफीही मागावी लागली. अश्विनने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक मेसेज पोस्ट केला होता. या मेसेजमध्ये अश्विनने म्हटले होते की, " शिधावाटप केंद्रात लोकांनी भरपूर गर्दी केलेली आहे." सध्याच्या घडीला देशभरात करोनाची भयावह परिस्थिती आहे. त्यामध्ये लोकांनी कुठेही गर्दी करु नये, असा नियम काढण्यात आलेला आहे. त्यामुळे अश्विनने यावेळी ही गोष्ट सांगत देशामध्ये नियमांची कशी पायमल्ली केली जात आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. अश्विनला आपची चुक यावेळी कळून आली. त्यानंत अश्विनने सोशल मीडियावर पुन्हा एकदा पोस्ट केली. यामध्ये अश्विन म्हणाला की, " काल मी एक फोटो शेअर केला होता आणि त्यामध्ये शिधावाटप केंद्रात गर्दी उसळली होती, असे म्हटले होते. पण माझ्याकडून ही चुक घडली आहे. कारण हा फोटो शिधावाटप केंद्राचा नव्हता, तर औषध घेणाऱ्या लोकांचा होता. आपल्या कुटुंबियांसाठी लोकांनी औषधं घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. त्यामुळे माझ्याकडून काल ही चुक झाली. पण तरीही लोकांनी सध्याच्या काळात अशी गर्दी करु नये, असे मला वाटते." चेन्नईतील ही गोष्ट असल्याचे समजत आहे. या फोटोमध्ये भरपूर गर्दी असल्याचे पाहायला मिळाले होते. सुरुवातीला ही गर्दी अन्य-धान्य खरेदी करण्यासाठी असल्याचे अश्विनला वाटले आणि त्याने तशी पोस्ट केली होती. पण त्यानंतर ही गर्दी औषधांसाठी असल्याचे अश्विनला समजले आणि त्याने या चुकीची दुरुस्तीही केली आहे. अश्विनची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. त्याचबरोबर चाहत्यांनी यावेळी चुकीची दुरुस्ती केल्यानंतर अश्विनबाबत चांगले मतही व्यक्त केले आहे. पण करोनाच्या काळात चुका कशा टाळता येतील, यावर सर्वांनीच भर द्यायला हवा.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3yeFiBQ
No comments:
Post a Comment