नवी दिल्ली: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम लढत होणार आहे. या लढतीला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असून इंग्लंडमधील साउथहॅप्टन येथे १८ ते २२ जून दरम्यान ही मॅच होणार आहे. वाचा- या सामन्याबाबत अनेक जण आपआपले अंदाज व्यक्त करत आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार याबाबत आघाडीवर आहे. काही दिवसांपूर्वी त्याने भारताचा कर्णधार विराट कोहलीपेक्षा न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन हा महान फलंदाज असल्याचे वक्तव्या करून नवा वाद सुरू केला होता. आता त्याने फायनलबद्दल एक भविष्यवाणी केली आहे. वाचा- वॉनच्या मते WTCची फायनल लढत भारत जिंकणार नाही. ही लढत न्यूझीलंड जिंकले. इंग्लंडमधील वातावरण, ड्यूक बॉल आणि भारताचा एका पाठोपाठ एक भरगच्च कार्यक्रम, ते काही आठवडे आधी इंग्लंडमध्ये पोहोचतील आणि न्यूझीलंडविरुद्ध त्यांना अंतिम मॅच खेळायची आहे. या उटल न्यूझीलंडचा संघ आधीपासून इंग्लंडमध्ये आहे. ते इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंडसाठी फायनल आधीचा सराव सामना असेल. त्यांना फायनलच्या तयारीसाठी संधी मिळेल. वाचा- भारतीय संघाने मायदेशात इंग्लंडचा पराभव करून टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका स्थगित झाल्याने न्यूझीलंडने फायनलमध्ये स्थान मिळवले होते. वाचा- माझ्यासाठी तर खुप सोपी निवड ठरले. न्यूझीलंडचा संघ भारतापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने तयारी करेल. त्याच्याकडे असे खेळाडू असतील ज्यांनी लाल चेंडूने अधिक क्रिकेट खेळले असेल. माझ्यासाठी तर न्यूझीलंड विजय होईल असे मायकल वॉन म्हणाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3u3x4cm
No comments:
Post a Comment