लंडन: भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया प्रथम न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. करोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलच्या १४ व्या हंगामातील उर्वरीत ३१ लढती इंग्लंडमध्ये घेण्याची बीसीसीआयची योजना आहे. यासाठी त्यांनी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला एक विनंती केली आहे. वाचा- आयपीएलच्या १४व्या हंगामातील ३१ लढतींसाठी कसा वेळ काढायचा याचे सर्वात आव्हान बीसीसीआयला आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यानंतर मिळणाऱ्या वेळेत आयपीएलच्या लढती इंग्लंडमध्ये खेळवण्याची बीसीसीआयची योजना आहे. यासाठी त्यांनी इसीबीला विनंती केली आहे की, दोन्ही देशात होणारी पाच सामन्यांची कसोटी मालिका एक आठवडा आधी सुरू करावी. ज्यामुळे आयपीएलच्या ३१ सामन्यांसाठी वेळ मिळले. वाचा- यासंदर्भात बीसीसीआयकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. पण इंग्लंडचे माजी कर्णधार आणि प्रसिद्ध क्रिकेट लेखक मायकल अथरटन यांनी द टाइम्सला याबाबत सांगितले. द टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलचा १४वा हंगाम पूर्ण करण्यासाठी बीसीसीआयने इसीबीला कसोटी मालिका एक आठवडा आधी सुरू करण्याची विनंती केली आहे. संबंधित दोन्ही बोर्डातील अधिकाऱ्यांच्यात या संदर्भात अनौपचारिक चर्चा झाली आहे. कारण करोनामुळे क्रिकेटचे वेळापत्रक फार बिघडलय. वाचा- भारत आणि न्यूझीलं यांच्यात १८ ते २२ जून या काळात टेस्ट चॅम्पियनशिप होईल. त्यानंतर इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3u59agQ
No comments:
Post a Comment