मुंबई: इंग्लंड आणि न्यूझीलंड () यांच्यात पुढील दोन आठवड्यात कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पण ही दोन सामन्यांची कसोटी मालिका अचानक ठरवण्यात आली. जागतिक क्रिकेटमध्ये असे फार कमी वेळा होते की जेव्हा फ्यूचर टूर प्रोग्राममध्ये एखाद्या मालिकेचे आयोजन होते. ही मालिका खेळवण्याची चर्चा जानेवारीत सुरू झाली. यासंदर्भात एक तपशीलवार रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये कसोटी मालिकेचे आयोजन का करण्यात आले आहे याबद्दल सांगितले आहे. वाचा- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून पुढील अनेक वर्षांच्या मालिकांचे नियोजन केले जाते. या नियोजनात कधी, कोणता संघ, कोणत्या संघाविरुद्ध कुठे आणि कोणत्या प्रकारची मालिका खेळणार आहे याचा तपशील असतात. पण इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिका एफटीपीचा भाग नव्हती. इतक नव्हे तर ही मालिका आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग नव्हती. मग असे असताना प्रश्न निर्माण होतो की ही मालिका का खेळवली जात आहे. वाचा- इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्याती मालिका एक अतिरिक्त मालिका म्हणून होत आहे. जेव्हा या मालिकेचे नियोजन झाले तेव्हा ती अतिशय हेक्टिक शेड्यूलमध्ये होती. कारण आयपीएल २०२१ स्पर्धा पूर्ण झाली असती तर इंग्लंड आणि न्यूझीलंडचे अनेक आघाडीचे खेळाडू या मालिकेत खेळू शकले नसते. आता तुम्हाला वाटले की यजमान इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड त्यांच्या फायद्यासाठी ही मालिका घेत आहे. तर तसे देखील नाही. वाचा- या दोन सामन्यांच्या माध्यमांच्या हक्कातून ईसीबीची कमाई होणार नाही. तर प्रसारणकर्त्यासाठी ते एक बक्षीस असणार आहे. २०२० चा हंगाम करोनामुळे वाया गेला होता. तेव्हा झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ईसीबीने याचे आयोजन केले आहे. याचा फायदा प्रसारणकरत्यांना होणार होणार. त्या बरोबर चाहत्यांना देखील अतिरिक्त क्रिकेट पाहायला मिळले. वाचा- इतकच नव्हे तर न्यूझीलंड संघासाठी या मालिकेमुळे सर्वाधिक फायदा होणार आहे. कारण त्यांना भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळायची आहे. या मालिके संदर्भात आणखी एक प्रश्न उपस्थित केला जात आहे, तो म्हणजे न्यूझीलंड आणि इंग्लंड जर WTCच्या फायनलमध्ये पोहोचले असते तर या मालिकेच आयोजन केले असते का? याचे उत्तर हो असे द्यावे लागेल. कारण ही मालिका फक्त प्रसारणकर्त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी आयोजित केली गेली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3i6diuE
No comments:
Post a Comment