नवी दिल्ली : खेळाडूला वयाचं बंधनं असतं, अस म्हटलं जातं. पण सध्याच्या घडीला ९१ वर्षीय क्रिकेटपटूही मैदान गाजवत असल्याचे आता समोर आले आहे. या ९१ वर्षाच्या क्रिकेटपटूचा व्हिडीओ सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल होत असल्याचेही दिसत आहे. डग क्रॉवेल, असे या ९१ वर्षीय क्रिकेटपटूंचे नाव आहे. ते ऑस्ट्रेलियाचे आहेत आणि वयाच्या ९१ वर्षीही त्यांचा क्रिकेट खेळण्याचा उत्साह दांडगा आहे. अजूनही मैदान येऊन ते दमदार फटकेबाजी करत आणि मैदान गाजवत असल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण अजून क्रिकेटमध्ये ते सहभागी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. क्रॉवेल यांनी यावेळी सांगितले की, " माझे शरीर मला चांगले साथ देत आहे. त्यामुळेच मी पूर्णपणे फिट असून अजूनही मैदाात क्रिकेट खेळू शकतो. सध्याच्या घडीला मी क्रिकेटचा आनंद लुटत आहे, त्यामुळे जेव्हा माझी संघात निवड होईल तेव्हा नक्कीच मी खेळायला जाईन." वयाच्या १६व्या वर्षी क्रॉवेल यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. आपल्या फिटनेसबाबत त्यांनी सांगितले की, " फिट राहण्यासाठी मी आठवड्यातून तीन दिवस टेनिस खेळतो. मला वाटतं की तुमचे जे जुने मित्र आहेत, त्यांच्यामुळेच क्रिकेटमधून बरेच काही मिळवले जाऊ शकते. जे खेळाडू ३० वर्षांच्या जवळपास क्रिकेटला अलविदा करतात त्यांच्यासाठी हा वेटरंस क्रिकेट क्लब आहे. त्यांच्यामध्ये खेळण्याचा उत्साह अजूनही आहे. त्यांच्यामध्ये सर्वात जास्त वयाचा खेळाडू मीच आहे. पण मी कोणत्या गोष्टीबाबत सांगू शकत नाही. कारण ९०व्या वर्षीही एखादी व्यक्ती स्पर्धात्मक क्रिकेट खेळू शकते."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fmWVH7
No comments:
Post a Comment