मुंबई: अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची उद्या मंगळवारी ऑनलाइन बैठक होणार आहे. या बैठकीत भारतात या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयसाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची असणार आहे. वाचा- आयसीसीच्या या बैठकीत आधी बीसीसीआयने शनिवारी बैठकीत आयपीएलच्या १४व्या हंगामातील उर्वरित लढती युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला होता. त्याच बरोबर टी-२० वर्ल्डकप संदर्भात निर्णय घेण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागण्याचे ठरवले. वाचा- या बैठकीसाठी बीसीसीआयचे अध्यक्ष स्वत: उपस्थित राहण्याचे ठरवले होते. पण आता ते ऑनलाइन या बैठकीत उपस्थित राहतील आणि आयपीएलच्या नियोजनासंदर्भात युएई क्रिकेट बोर्डासोबत चर्चा करण्यासाठी ते बुधवारी युएईला रवाना होणार आहेत. आयसीसीच्या या बैठकीत काही ठोस निर्णय होण्याची शक्यता नाही. एक जुलैनंतर आणखी एका बैठक बोलवणार असल्याचे कळते. आयसीसीकडून १८ जुलै रोजी टी-२० वर्ल्डकपसंदर्भात औपचारिक घोषणा केली जाऊ शकते. वाचा- आयपीएलच्या उर्वरित लढतीसाठी बीसीसीआयने युएईची निवड केली आहे. या लढती १९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या काळात होण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर भारताला टी-२० वर्ल्डकपचे यजमानपद देखील गमवायचे नाही. वाचा- पीटीआयने बीसीसीआयमधील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भारतात करोना रुग्णांची संख्य कमी होत आहे. पण सध्या अशी परिस्थिती नाही की वर्ल्डकप संदर्भात आम्ही काही ठोस सांगू शकू. यासाठी गांगुली आणि जय शहा यांनी एक महिन्याचा वेळ मागितला आहे. यासंदर्भात बीसीसीआयला निश्चितपणे सरकारकडून देखील सल्ला दिला जाईल. यजमानपद भारताकडे राहीले तर स्पर्धा देशातील ९ ठिकाणी घेण्याऐवजी मुंबईतील तीन मैदानावर खेळवली जाऊ शकते. या शिवाय बीसीसीआयला आयसीसी सोबत आणखी एका महत्त्वाच्या विषयावर तोडगा काढायचा आहे. तो म्हणजे वर्ल्डकप स्पर्धेसाठी मिळणाऱ्या सवलतीचा होय. तसेच २०२३ ते २०३१ या आठ वर्षातील कार्यक्रम, द्विपक्षीय मालिका, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप यावर देखील चर्चा होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3yU6aHQ
No comments:
Post a Comment