मुंबई : तौत्के चक्रीवादळामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाचा आता तडाखा वानखेडे स्टेडियमलाही बसला आहे. वानखेडे स्टेडियम हे समुद्राच्या जवळ आहे. त्यामुळे जोरदार पाऊस आणि वाऱ्याचा मोठा फटका वानखेडे स्टेडियमला बसला आहे. यावेळी वानखेडे स्टेडियमचे नुकसान झाले असून त्याचा फोटो आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. तौत्के चक्रीवादळामध्ये वानखेडे स्डेडियममधील एक स्टँड कोसळल्याची माहिती समोर येत आहे, त्याचरोबर मैदानातील एका साइड स्क्रीनचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. फलंदाजी करताना खेळाडूला एकाग्रता ठेवता यावी, यासाठी साइड स्क्रीनचा उपयोग केला जातो. पण आता ही साइड स्क्रीन कोसळल्याचे पाहायला मिळत आहे. वानखेडे स्डेडियमचे जे नुकसान झाले आहे, त्याचा फोटो आता चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. एका पत्रकाराने हा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. त्यानंतर हा फोटो चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये वानखेडे स्टेडियमचे किती नुकसान झाले आहे, हे पाहता येऊ शकते. याच वानखेडे मैदानावर २०११ साली झालेल्या विश्वचषकाची अंतिम फेरी रंगली होती. त्यावेळी भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा पराभव करून विश्वचषक पटकावला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tWyJAG
No comments:
Post a Comment