ढाका: बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्याच्या काही तास आधी श्रीलंकेच्या संघातील तिघा खेळाडूंना करोनाची लागण झाली. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. यातील पहिली लढत आज, दुसरी २५ आणि तिसरी २८ मे रोजी होणार आहे. बांगलादेशमधील ढाका येथे होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्याच्या आधी दोन खेळाडू आणि प्रशिक्षक यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण असे असेल तरी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ही मॅच रद्द होणार नाही असे सांगितले. श्रीलंकेच्या संघातील इसुरू उडाना आणि शिरन फर्नांडो तर गोलंदाजीचे प्रशिक्षक चमिंडा वास यांना करोनाची लागण झाली आहे. वाचा- या तिघांच्या करोना चाचणी पॉझिटिव्ह आली तरी देखील सामना खेळवण्याचा निर्णय झाला आणि त्याची सुरुवात झाली. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3yw2hII
No comments:
Post a Comment