मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष याची ओळख दादा अशी आहे. गांगुलीने बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यापासून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मैदानावर असे की क्रिकेट प्रशासन गांगुलीच्या दादागिरी कोणाचे काही चालत नाही. गांगुलीने पुन्हा एकदा क्रिकेट प्रशासनातील त्याचा मास्टर स्ट्रोक दाखवून दिला. वाचा- बीसीसीआयची आज शनिवारी एक महत्त्वाची बैठक झाली. या ऑनलाइन बैठकीत दादाच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयने असा एक निर्णय घेतला ज्यामुळे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला भारतातच आयोजित करावा लागेल. वाचा- करोना व्हायरसमुळे चार मे रोजी स्थगित करण्यात आलेला आयपीएलचा १४वा हंगाम आता सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये होणार आहे. २०२१ मध्ये ३१ लढती शिल्लक आहेत. यासाठी २५ दिवसांचा कालावधी बीसीसीआयने निश्चित केला आहे. याची घोषणा बीसीसीआयने आज केली. यानंतर टी-२० वर्ल्डकपचे आयोजन केले जाणार आहे. टी-२० वर्ल्डकपचे आयोजन भारताकडे आहे. पण करोनामुळे स्पर्धा अन्य ठिकाणी होण्याची शक्यता होती. यावर गांगुलीने आयसीसीला आयपीएलचा गुगली टाकला. वाचा- भारतात करोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी प्रत्येक दिवसाला दीड लाख रुग्ण सापडत आहेत. भारतात टी-२० वर्ल्डकपचे आयोजन करणे सुरक्षित असणार नाही असे आयसीसीचे मत आहे. ही स्पर्धा युएईमध्ये आयोजित करावी अशी तयारी त्यांच्याकडून सुरू होती. पण बीसीसीआयने ही योजना मागे घेण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईमधील तीन मैदानावर आयपीएलच्या ३१ लढती होतील आणि त्यानंतर वर्ल्डकपमधील ४५ लढती पुन्हा त्याच मैदानावर खेळवणे ठिक होणार नाही. आयपीएलनंतर पुन्हा त्याच मैदानांवर टी-२० वर्ल्डकप शक्य नाही. युएईमध्ये आयपीएलच्या आधी PSLमधील २० लढती होणार आहे. एकूण ५१ लढतीनंतर वर्ल्डकपमधील सामने त्या मैदानावर खेळवल्यास संध खेळपट्टीमुळे स्पर्धेतील चुरस कमी होईल. अशा परिस्थितीत टी-२० वर्ल्डकप भारतात आयोजित करणे योग्य ठरले. वाचा- बीसीसीआयच्या बैठकीत देखील हाच निर्णय झाला की १ जून रोजी होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनासाठी थोडा वेळ मागून घ्यायचा. देशात करोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे बीसीसीआयला वर्ल्डकप आयोजनासाठी वेळ मिळू शकतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2SEY19e
No comments:
Post a Comment