नवी दिल्ली : सध्याच्या घडीला बॉलिवूड अभिनेता सोनू सुदचे ()सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. पण सोनुने यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघातील एका खेळाडूचे कौतुक केले आहे. करोनाच्या या कठीण काळात हा खेळाडू मोठं काम करत असल्याचे सोनूने यावेळी सांगितले आहे. करोनाच्या काळात गरजूंना जी मदत लागेल ती सोनू देत असल्याचे पाहायला मिळाले आहे. पण सोनूला यावेळी चेन्नई सुपर किंग्स संघातील खेळाडू कर्ण शर्मा () मदत करत असल्याचे आता समोर आले आहे. या कठीण काळात कर्ण सोनूच्या पाठिशी ठामपणे उभा असून त्याला मदत करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. ट्विटरच्या माध्यमातून सोनूने यावेळी कर्णचे कौतुक केले आहे. यावेळी सोनूने सांगितले की, " सोनू सुद फाऊंडेशनसाठी सातत्याने मदत करणाऱ्या कर्ण शर्माचे आभार. कर्ण, तु पुन्हा एकदा देशातील युवाशक्तीला प्रेरित केले आहेस आणि तुझ्यासारख्या लोकांमुळेच वास्तवामध्ये हे जग सुंदर आणि शांतीपूर्ण होऊ शकते. त्यामुले तुझे आभार." सोनू सूदच्या या भावुक ट्विटनंतर कर्णनेही त्यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. कर्णने यावेळी म्हटले आहे की, " सोनू, तु देशाचा खरा हिरो आहेस. तु फारच चांगले काम करत आहे, त्यामुळे तुझ्या या कामाला आमच्याकडून सलाम. तु असंच काम पुढेही करत राहा."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eYc6HC
No comments:
Post a Comment