नवी दिल्ली : पृथ्वी शॉ याने काही दिवसांमध्ये चांगल्या धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये तर त्याने विक्रमही नोंदवला होता. पण तरीही पृथ्वीची भारतीय संगात निवड करण्यात आली नाही. या सर्व गोष्टीमागे काही कारणं असल्याचे समोर आले आहे. ऑस्ट्रेलियातील पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी अपयशी ठरला आणि त्यानंतर त्याची भारतीय संघातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर बीसीसीआयच्या स्थानिक सामन्यांमध्ये पृथ्वीने आठ सामन्यांमध्ये ८००पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्यानंतर आयपीएलमध्येही पृथ्वीने धडाकेबाज फलंदाजी केली होती. पण त्यानंतरही इंग्लंडच्या दौऱ्यासाठी त्याच्या नावाचा विचार केला गेला नाही. याबाबत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सलमान बट्टने सांगितले की, " पृथ्वीमध्ये गुणवत्तेची काहीच कमी दिसत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये त्याने चांगल्या धावा केल्या आहेत. पण तरीही त्याची निवड भारतीय संघात झाली नाही. माझ्यामते पृथ्वी हा काही फटके खेळण्यात घाई करतो, त्यामुळेच त्याच्या फलंदाजीमध्ये सातत्य राहत नाही. भारतीय संघात अशा खेळाडूला संधी दिली जाते जो कामगिरीत सातत्य दाखवतो. त्यानुसार आता पृथ्वीला आपल्या खेळात बदल करावा लागेल. पृथ्वी एकसारखीच फलंदाजी करतो, त्यामुळे त्याला यामध्ये काही बदल करणे गरजेचे आहे." यावर्षीच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना पृथ्वीने ३००पेक्षा जास्त धावा बनवल्या आहेत. सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता. पण अन्य खेळाडूंची आयपीएलच्या धर्तीवर निवड होत असताना पृथ्वीला मात्र संघात स्थान दिलेले नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tYsnRa
No comments:
Post a Comment