मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयची SGM २९ मे रोजी होणार आहे. या बैठकीत आयपीएलच्या १४व्या हंगामातील ३१ सामने कधी खेळवायचे असतील यासंदर्भात अंतिम निर्णय होऊ शकतो. उर्वरित सामन्यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यातील तारखा शोधत आहे. करोनामुळे आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित करण्यात आला होता. आता दुसऱ्या टप्प्यातील लढती युएईमध्ये होण्याची शक्यता आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयला आयपीएलमधील उर्वरित लढतींचे आयोजन युएइमध्ये खेळवायच्या आहेत. याआधी देखील आयपीएलचा १३वा हंगाम युएइमध्ये पार पडला होता. वाचा- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दोन कसोटी सामन्यातील कालावधी कमी केला नाही तर ३० दिवसात भारतीय संघ आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना युके मधून युएइमध्ये आणण्यासाठी एक दिवस स्वतंत्रपणे काढावा लागले. त्याच बरोबर नॉकआउटच्या लढतीसाठी पाच दिवस स्वतंत्रपणे काढून ठेवावे लागतील. यामुळे बीसीसीआयला २७ सामन्यांसाठी २४ दिवस मिळतात. या काळात आठ शनिवार रविवार आहेत. याचा अर्थ डबल हेडरच्या माध्यमातून १६ सामने होऊ शकतात. त्यानंतर १९ दिवसात ११ सामने खेळवावे लागतील. वाचा- भारतीय क्रिकेट संघ २ जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. टीम इंडिया प्रथम १८ जून रोजी न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. या मालिकेची सुरूवात ४ ऑगस्टपासून होणार आहे. मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत ९ दिवसांचे अंतर आहे. बीसीसीआयची इच्छा आहे की हा कालावधी पाच दिवसांचा करावा. ज्यामुळे त्यांना आयपीएलच्या आयोजनासाठी पाच दिवस अतिरिक्त मिळतील. वाचा- असे झाले तर बीसीसीआयकडे १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर असा एक महिन्याचा कालावधी मिळतो. बीसीसीआयने अधिकृतपणे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला मालिकेचा कालावधी कमी करण्यास सांगितले नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2SgQqxy
No comments:
Post a Comment