नवी दिल्ली: करोना व्हायसमुळे गेल्या वर्षभरापासून परिस्थिती फार खराब आहे. पण याचा अर्थ असा नाही की भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयकडे पैसे नाहीत. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाच्या खजान्यात इतकाही पैसा कमी पडला नाही की त्यांना गेल्या वर्षी आयसीसीच्या स्पर्धेत उपविजेत्या संघाला त्याच्या हक्काच्या बक्षीसाची रक्कम देण्यास पैसे नाहीत. वाचा- वाचून कोणालाही धक्का बसले अशी ही घटना आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. भारतीय संघाला अंतिम फेरीत विजय मिळवता आला नाही. पण बक्षीसाची रक्कम म्हणून ३ कोटी ६४ लाख रुपये इतकी मोठी रक्कम खेळाडूंना अद्याप मिळाली नाही. ही रक्कम या आठवड्यात दिली जाणार आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली आणि त्यानंतर संघातील खेळाडूंना अद्याप पैसे दिले गेले नसल्याचे समोर आले. वाचा- पटू इंग्लंडमधील टेलीग्राफ या वृत्तपत्राने आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाच्या महासंघाच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. बीसीसीआयने गेल्या वर्षी फेब्रुवार-मार्च महिन्यात झालेल्या टी-२० वर्ल्डकपमधील उपविजेता ठरलेल्या संघातील खेळाडूंना अद्याप बक्षीसाची रक्कम दिले नाही. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महिला संघातील खेळाडूंना या आठवड्याच्या अखेरपर्यंत पैसे दिले जातील. याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मला आशा आहे की त्यांना लवकरच बक्षीसाची रक्कम मिळेल. खेळाडूंना पैसे देण्यात विलंब का झाला यावर ते म्हणाले, आम्हाला गेल्या वर्षाच्या अखेरीस ही रक्कम मिळाली होती. बीसीसीआयकडून सर्व संघातील खेळाडूंना पैसे देण्यास ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागतो. गेल्या वर्षी करोनामुळे बीसीसीआयचे मुख्यालय बंद होते. यामुळेच पैसे देण्यास विलंब झाला. वाचा- फक्त महिला संघाला नाही तर पुरुष संघातील करार करण्यात आलेले खेळाडू, आंतरराष्ट्रीय मॅच फी, पुरुष आणि महिला संघातील देशांतर्गत मॅच फी या सर्वांना सध्याच्या परिस्थितीत वेळ लागत आहे. करोनामळे देशांतर्गत मार्च महिन्यात संपलेल्या सत्राचे पैसे देण्यास सप्टेंबरपर्यंत वेळ लागतोय, असे बीसीसीआयशी संबंधीत एका माजी पदाधिकाऱ्याने सांगितले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vsHSCF
No comments:
Post a Comment