नवी दिल्ली : आयपीएलमधील ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना त्यांच्या देशाने प्रवेश बंदी केली होती. त्यामुळे त्यांनी मालदिव या देशाचा आसरा घेतला होता. पण आता हे सर्व खेळाडू आणि त्यांच्यासह प्रशिक्षक, समालोकही मायदेशी परतले आहेत. पण मायदेशी परतल्यावर पुन्हा एकदा या सर्वांसाठी चिंतेची बाब समोर आली आहे. कारण या सर्व व्यक्तींना आता आपल्या कुटुंबियांना भेटता येणार नाही. आयपीएलमध्ये सहभागी असलेले ३८ व्यक्ती आज सिडनीमध्ये दाखल झाले आहेत. हे सर्व खेळाडू १० दिवस मालदिवमध्ये क्वारंटाइन होते. पण ऑस्ट्रेलियामध्ये पोहचल्यावर त्यांना आपल्या कुटुंबियांना लवकर भेटता येणार नाही. कारण ऑस्ट्रेलिया सरकारच्या नियमानुसार आता या सर्व खेळाडूंना सिडनीच्या एका हॉटेलमध्ये दोन आठवड्यांसाठी क्वारंटाइन व्हावे लागणार आहे त्यानंतर या सर्व खेळाडूंची करोना चाचणी होईल आणि त्यानंतर निगेटीव्ह आल्यावरच त्यांना आपल्या घरी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मायदेशी परतले असले तरी त्यांना दोन आठवडे आपल्या कुटुंबियांना भेटता येणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी खास विमान आयोजित करण्यात आले होते. या विमानाने हे सर्व जणं मालदिवहीन सिडनीला रवाना झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने १५ मेपर्यंत विमानबंदी जाहीर केली होती. त्याचबरोबर भारतामध्ये गेलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्यांनी प्रवेश नाकारला होता. त्यामुळे १० दिवस मालदिवमध्ये क्वारंटाइन राहिल्यावर आज हे सर्व व्यक्ती ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eY4XY5
No comments:
Post a Comment