नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारण्याचा विक्रम हा तसा दुर्मिळ म्हणावा लागले. आंतरराष्ट्रीय किंवा स्थानिक क्रिकेटमध्ये असा विक्रम करणारे काही मोजके फलंदाज आहेत. अशा मोजक्या खेळाडूंमध्ये आणखी एकाचा समावेश झालाय. वाचा- भारतीय संघ सध्या क्रिकेट खेळत नसला तरी युरोपमध्ये सामने सुरू आहेत. युरोपियन क्रिकेट सिरीजमधील टी-१० Bayer Uerdingen Boosters कडून खेळताना एका षटकात सहा षटकार मारण्याचा विक्रम गेला गेलाय या क्रिकेटपटूने Koln Challengers विरुद्ध खेळताना हा विक्रम केला. वाचा- वाचा- वाचा- अरिथरनने डावातील पाचव्या षटकातील ६ चेंडूवर ६ षटकार मारले. त्याने गोलंदाज आयुष शर्मा याच्या गोलंदाजीवर हा विक्रम केला. अरिथरनने संपूर्ण डावात ७ षटकार आणि ३ चौकार मारले. त्याने ६१ धावा केल्या आणि संघाला १० षटकात ११५ धावांची मजल मारून दिली. स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सात सामन्यात अरिथरनने १८०च्या स्ट्राइक रेटने १६१ धावा केल्या आहेत. वाचा- क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये ६ षटकार मारणारे फलंदाज १) गॅरी सोबर्स- १९६८ साली प्रथम श्रेणीत, अशी कामगिरी करणारे पहिले फलंदाज २) रवि शास्त्री- १९८४ साली रणजी ट्रॉफीत बडोदाविरुद्ध १ ओव्हरमध्ये ६ षटकार मारले ३) हर्शल गिब्स- २००७च्या वर्ल्डकपमध्ये नेदरलँडविरुद्ध ६ षटकार मारले, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला फलंदाज ४) युवराज सिंग- २००७च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध केला हा विक्रम ५) रॉस विटिली- काउंटी क्रिकेटमध्ये २०१७ साली यॉर्कशायरविरुद्ध केला विक्रम ६) हरजतुल्लाह जजाई- २०१८ मध्ये अफगाणिस्तान प्रीमिअर लीगमध्ये एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारले. ७) लियो कार्टर- २०२० मध्ये न्यूझीलंडच्या देशांतर्गत स्पर्धेत ही कामगिरी केली ८) कायरन पोलार्ड- २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध टी-२० सामन्यात ६ षटकार मारले
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oARk3Y
No comments:
Post a Comment