नवी दिल्ली : आगामी कसोटी मालिकेसाठी इंग्लंडच्या १५ सदस्यीय संघाची निवड आज मंगळवारी करण्यात आली. या संघात आयपीएल खेळलेल्या खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे दुखापतीमधून अजून सावरलेले नाहीत. त्यामुळे त्यांचाही यावेळी संघात समावेश करण्यात आलेला नाही. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका जून महिन्यात खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी आज इंग्लंडच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. आयपीएल स्थिगत झाल्यानंतर इंग्लंडचे खेळाडू मायदेशीत परतले होते. हे सर्व खेळाडू आता क्वारंटाइनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना आराम करण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला असून त्यांचा संघात सामेवश करण्यात आलेला नाही. यामध्ये मोइन अली, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, सॅम करन आणि ख्रिस वोक्स यांचा समावेश आहे. या खेळाडूंना आता आराम करायला दिला असून ते काही दिवसांनी आपल्या कौंटी संघाकडून खेळू शकतील. इंग्लंडच्या या संघात जेम्स ब्रेसी या यष्टीरक्षकाला पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे, त्याचबरोबर वेगलान गोलंदाज ऑली रॉबिन्सन हादेखील पहिल्यांदाच संघात दिणास आहे. या संघात क्रेग ओव्हरटर या अष्टपैलू खेळाडूचे पुनरागमन झाले आहे, तो आपला अखेरचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१९मध्ये खेळला होता. बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांची दुखापत अजूनही बरी झालेली नाही. त्यामुळे त्यांचा विचार यावेळी करण्यात आलेला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर इंग्लंडचा संघ भारताबरोबर दोन हात करणार आहे. त्यावेळी कदाचित या दोघांचा विचार संघासाठी केला जाण्याची शक्यता आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33WdWSW
No comments:
Post a Comment