मुंबई: भारतीय संघाच्या नेतृत्वावरून नेहमी चर्चा होत असते. विद्यमान कर्णधार विराट कोहली( )चे वर्कलोड कमी करण्यासाठी वेगवेगळ्या फॉर्मेटमध्ये वेगवेगळे कर्णधार करण्याचे मत अनेक दिग्गजांनी याआधी व्यक्त केले आहेत. आता भारतीय संघाचे माजी मुख्य निवड समिती प्रमुख किरण मोरे यांनी देखील एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. माजी विकेटकीपर असलेल्या मोरे यांनी कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी वेगवेगळा कर्णधार असू शकतात असे म्हटले आहे. वाचा- एका मुलाखतात किरण मोरे यांनी सांगितले की, या वर्षी भारतीय संघाचे वेळापत्रक खुपच व्यस्त आहे. भारताला लवकरच यावर काम करावे लागणार आहे. जर असे झाले तर ही खुप मोठी गोष्ट असेल, कारण याआधी कधीच असे झाले नाही. याच बरोबर त्यांनी ( )चा उल्लेख करताना सांगितले की, रोहितला मर्यादीत षटकाचा कर्णधार केला जाऊ शकते. धोनीच्या नेतृत्वात तयार झालेला एक चालाख कर्णधार आहे. पण तिनही फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी करणे अशक्य असते. वाचा- विराट कोहलीला देखील याचा विचार करावा लागले की वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये तो किती काळ नेतृत्व करू शकतो. कदाचित इंग्लंड दौऱ्यावर तुम्ही याबाबत चर्चा ऐकू शकाल, असे किरण मोरे म्हणाले. वाचा- भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून प्रथम न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. विशेष म्हणजे जेव्हा भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी खेळत असेल तेव्हा भारताचा दुसरा संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. तेथे वनडे आणि टी-२० मालिका खेळणार असून या संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर किंवा शिखर धवन यांच्याकडे जाऊ शकते. जागतिक क्रिकेट मध्ये प्रत्येक फॉर्मेटसाठी स्वतंत्र करणार नियुक्त करण्याचा प्रयोग ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका सारखे संघ करत आहेत. हे संघ कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी वेगवेगळे कर्णधार नेमतात.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3c3XdBL
No comments:
Post a Comment