नवी दिल्ली: भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी इरफान पत्नी सफा बेगच्या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेत आलाय. पत्नीमुळे चर्चेत येण्याची ही त्याची पहिली वेळ नाही. इरफान पठाणने मुलगा इमरान आणि पत्नीसह एक फोटो इस्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोत पत्नी सफाचा फोटो ब्लर केला होता. सफाचा चेहरा रंगाने ब्लर केला होता जेणेकरून तिचा चेहरा दिसू नये. या फोटोनंतर इरफानवर सोशल मीडियावर जोरदार टीका सुरू झाली. वाचा- माजी जलद गोलंदाज इरफान सोशल मीडियावर स्वत:चे फोटो शेअर करत असतो. पण या फोटोत कधीही त्याची पत्नी दिसत नाही. ज्या फोटोत पत्नी सोबत असते त्या फोटोत तिचा चेहरा कधीच दिसत नाही. इरफानची पत्नी सफाने नेहमी चेहरा झाकलेला असतो. पण यावेळी शेअर केलेल्या फोटोमध्ये मात्र तसे नव्हते. वाचा- मुलाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या या फोटोत सफाचा फोटो रंगाने ब्लर करण्यात आला होता. यावरून काही युझर्सनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावरील प्रतिक्रियेनंतर इरफानने त्या फोटोटा ट्विट केले आणि म्हटले की, हा फोटो माझ्या क्वीन (पत्नी)ने मुलाच्या अकाउंटवरून शेअर केला आहे. या फोटोवरून बरीच चर्चा सुरू आहे. मलाही हा फोटो येथे पोस्ट करू द्या. माझ्या पत्नीने तिच्या आवडीने हा फोटो ब्लर केला आहे. आणि एक गोष्ट महत्त्वाची मी तिचा मालक नाही, जीवनसाथी आहे. वाचा- इरफानच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्या फोटोचे समर्थन केले. पठाणची पत्नी जेद्दा येथील मॉडल होती. या दोघांचा विवाह २०१६ मध्ये झाला. इरफान आणि सफा यांना एक मुलगा असून त्याचे नाव इमरान आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fm56on
No comments:
Post a Comment