नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने () काही दिवसांपूर्वी आपल्या बायकोबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये पत्नीच्या चेहऱ्याला ब्लर करण्यात आले होते. त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी इरफानला चांगलेच ट्रोल केले होते आणि त्याच्यावर जोरदार टीकाही केली होती. पण आता या टीकेनंतर इरफानची पत्नी सफा बेग () हिने मौन सोडले आहे. त्याचबरोबर टीकाकानांचा सफाने चांगलेच सुनावले आहे. हा फोटो आतापर्यंत चांगलाच वादग्रस्त ठरला होता. इरफानची पत्नी सफाने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, " मी इमरानच्या नावाने इंस्टाग्रामचे खाते उघडले आहे आणि या इंस्टाग्रामवर मी पोस्ट करत असते. या गोष्टीचे कारण म्हणजे तो जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याला या सर्व गोष्टी पुन्हा आठवता येऊ शकतील. हा फोटो मीच पोस्ट केला होता आणि हा फोटो ब्लरदेखील मीच केला होता. हा माझाच निर्णय होता. या गोष्टीशी इरफानचे काहीही घेणेदेणे नाही. मला कधी वाटलं देखील नव्हते की, एका कुटुंबाचा फोटो एवढा वादग्रस्त ठरू शकतो. मला प्रसिद्धी जास्त आवडत नाही, त्याचबरोबर सेंटर ऑफ अट्रेक्शन बनणे मला कधीही आवडत नाही." काही दिवसांपूर्वी इरफानने आपल्या ट्विटरवर हाच फोटो शेअर केला होता. याबद्दल इरफानने लिहिले होते की, " हा फोटो माझ्या पत्नीने मुलाच्या सोशल मीडिया खात्याद्वारे पोस्ट केला आहे. बऱ्याच जणांनी आम्हाला ट्रोलही केले. हा फोटो माझ्या पत्नीनेच ब्लर केला आहे. कारण तिला हाच फोटो ब्लर करावासा वाटत होता. यामध्ये आणखीन कोणाचा हात नाही. मी तिचा एक चांगला मित्र आहे, मास्टर नाही." हा फोटो जेव्हा सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता तेव्हा त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. इरफानने आपल्या पत्नीचा फोटो जाणून बुजून ब्लर केला आहे, असेही काही जणांनी म्हटले होते. पण आता हा फोटो इरफानच्या पत्नीनेच ब्लर केला होता, ही गोष्ट आता स्पष्ट झाली आहे. त्यामुळे इरफानच्या पत्नीने आता टीकारांची तोंड बंद केल्याचे पाहायला मिळत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3p7yAcS
No comments:
Post a Comment