नवी दिल्ली : वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाने ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी आपला संघ आज जाहीर केला आहे. या संघाचे कर्णधारपद मुंबई इंडियन्सच्या कायरन पोलार्डकडे आहे. त्याचबरोबर आयपीएल गाजवणाऱ्या दिग्गजांना यावेळी संधी देण्यात आली आहे. यावेळी वेस्ट इंडिजच्या संघात ख्रिस गेल आणि ड्वेन ब्राव्हो यांचाही समावेश करण्यात आला आहे. वेस्ट इंडिजच्या या संघाचे उपकर्णधारपद निकोलस पुरनकडे सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज शेल्डन कॉटरेल, जेसन होल्डर आणि फिडेल एडवर्ड्स यांचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. वेस्ट इंडिजच्या या संघात फॅबियन अॅलेन, आंद्रे फ्लेचर आणि शिमरॉन हेटमायर यांनाही संधी देण्यात आलेली आहे. जून महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात पाच ट्वेन्टी-२० सामने खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाचा संघ येणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ या दौऱ्यात पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. हे पाच सामने ५ जुलै ते १६ जुलै या कालावधीत होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघानंतर पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिजमध्ये दाखल होणार आहे. पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिजमध्ये २७ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीमध्ये पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ynrZPu
No comments:
Post a Comment