चेन्नई: ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकल हसीच्या मते या वर्षी भारतात टी-२० वर्ल्डकपचे आयोजन करणे सोपी गोष्ट असणार नाही. भारतात करोनाची दुसरी लाट आली आहे आणि देशातील परिस्थिती पाहता वाटत नाही की वर्ल्डकपचे आयोजन होऊ शकले. भारतात या वर्षाच्या अखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नियोजित आहे. वाचा- आयपीएलच्या १४व्या हंगामात भाग घेण्यासाठी भारतात आला होता. चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजीचा कोच असलेल्या हसीला करोनाची लागण झाली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला हसी ऑस्ट्रेलियात पोहोचला. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करोना झाल्याने त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. वाचा- हसीला यावर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपबाबत विचारले असता तो म्हणाला, मला वाटते की भारतात वर्ल्डकप होणे खुप अवघड आहे. आपण आयपीएलच्या ८ संघांकडे बघा. वर्ल्डकपमध्ये इतके किंवा त्यापेक्षा जास्त संघ असतील. ते वेगवेगळ्या शहरात खेळले तर जास्त धोका आहे. वाचा- कुठे व्हावा वर्ल्डकप? जर वर्ल्डकप युएई किंवा अन्य कोणत्या तरी देशात आयोजित झाला तर बरे होईल, असे हसी म्हणाला. अशा परिस्थितीत भारताचा दौरा करण्यास संघांना नक्कीच भीती वाटले. वाचा- मला वाटते की बीसीसीआयला लवकरच कोणता तरी प्लॉन करावा लागेल. अनेक क्रिकेट बोर्डांनी या स्पर्धेसाठी भारतात जाऊ नये. त्याचे आयोजन अन्य ठिकाणी करावे असे तो म्हणाला. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33Xt9TU
No comments:
Post a Comment