नवी दिल्ली: क्रिकेट विश्वातील सर्व चाहत्यांना प्रतिक्षा असलेल्या सर्वात रोमांचक आणि धमाकेदार अशा अॅशेज कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ऑस्ट्रेलियाने या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले. बुधवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दोन्ही देशात होणाऱ्या पाच सामन्यांची तारीख आणि ठिकाणांचे घोषणा केली. वाचा- ऑस्ट्रेलियाचा संघ अॅशेज मालिकेच्या आधी अफगाणिस्तान संघाविरुद्ध घरच्या मैदानावर एकमेव कसोटी खेळणार आहे. गेल्या वर्षी करोना व्हायरसमुळे हा सामना स्थगित करण्यात आला होता. ही लढत होबार्ट येथे २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या काळात होणार आहे. त्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची खेळवली जाईल. वाचा- डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ब्रिसबेन येथे मालिकेची सुरूवात होईल. पहिली कसोटीत ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर दरम्यान गाबा येथे होईल. त्यानंतर एडिलेड येथे १६ ते २० डिसेंबर दरम्यान डे नाइट कसोटी सामना खेळवला जाईल. बॉक्सिंग डे ची परंपरा लक्षात घेता तिसरी लढत २६ ते ३० डिसेंबर या काळात मेलबर्न मैदानावर होईल. नव्या वर्षाची सुरूववात चौथ्या कसोटीने सिडनीमध्ये होईल. चौथी कसोटीत ५ ते ९ जानेवारी या काळात होणार. तर मालिकेतील अंतिम लढत पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर १४ ते १८ जानेवारी दरम्यान होणार आहे. वाचा- अॅशेज मालिकेचा संपूर्ण कार्यक्रम पहिली कसोटी- ८ ते १२ डिसेंबर, गाबा दुसरी कसोटी- १६ ते २० डिसेंबर, एडिलेड (डे-नाइड) तिसरी कसोटी-२६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न (बॉक्सिंग डे) चौथी कसोटी- ५ ते ९ जानेवारी, सिडनी पाचवी कसोटी- १४ ते १८ जानेवारी, पर्थ
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ykymTL
No comments:
Post a Comment