नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर आता आपल्याच संघातील एका खेळाडूने आरोप केले आहे. धोनी कर्णधार असताना मला जास्त संधीच दिली नाही, असे या क्रिकेटपटूचे म्हणणे आहे. धोनीवर हा आरोप भारताचा यष्टीरक्षक वद्धिमान साहाने केला आहे. यावर्षी आयपीएल खेळताना साहाला करोनाची लागण झाली होती. साहा आता करोना निगेटीव्ह आला आहे. त्याचबरोबर साहाची निवड आता इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात झाली आहे. साहा सध्या क्वारंटाइन असून येत्या काही दिवसांत तो इंग्लंडच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. साहाने इंडियन्स एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, " धोनी जेव्हा संघात होता तेव्हा मला जास्त खेळण्याच्या संधी मिळाल्याच नाहीत. २०१४ ते २०१८ या काळात मात्र मला चांगल्या संधी मिळाल्या. पण त्यानंतर मला दुखापत झाली आणि मी संघाबाहेर गेलो. त्यावेळी पार्थिव पटेल आणि रिषभ पंत हे भारतीय संघाकडून खेळले. पंतने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर संघातील स्थान कायम ठेवले आहे. पंतने संधीचे सोने केले. त्यामुळे आता पुन्हा एकदा मी संधी मिळण्याची वाट पाहत आहे." साहाने यावेळी सांगितले की, " प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीमध्ये चढ-उतार येत असतात. खेळाडूंना कधीही दुखापत होऊ शकते. तुम्ही भुवनेश्वर कुमारचेही उदाहरण घेऊ शकता. जेव्हा भुवनेश्वर पूर्णपणे फिट होता तेव्हा तो तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळत होता. पण आता दुखापतीमुळे त्याच्या कारकिर्दीवर परीणाम झाला आहे."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/348zlbK
No comments:
Post a Comment