नवी दिल्ली: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. या लढती आधी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यासाठी ते इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. वाचा- भारताविरुद्धच्या टेस्ट चॅम्पियनशिपच्या आधी न्यूझीलंडचा क्रिकेटपटू याने विवाह केलाय. निकोल्सने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. निकोल्सने त्याची गर्लफ्रेंडसोबत विवाह केला. लग्नाचे फोटो शेअर करताना तो म्हणतो, मिस्टर एक मिसेस निलोक्स. निकोल्सने दिलेल्या या गोड बातमीवर चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत. निकोल्सची पत्नी लूसी गेल्या काही वर्षापासून एकमेकांना ओळखत होते. वाचा- हेन्नरी निकोल्सने न्यूझीलंडकडून आतापर्यंत ३७ कसोटी, ५२ वनडे आणि पाच टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे २ हजार १५२, १ हजार ४०९ आणि १९ धावा केल्या आहेत. त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आले आहे. ही मालिका दोन जूनपासून सुरू होणार आहे. वाचा- आधी इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात न्यूझीलंड चांगल्या फॉर्ममध्ये येण्याचा प्रयत्न करेल. भारतीय संघ २ जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. यासाठी भारतीय खेळाडू सध्या मुंबईत एकत्र होत आहेत. आठ दिवसाच्या क्वारंटाइननंतर ते इंग्लंडला रवाना होतील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/347lH8X
No comments:
Post a Comment