नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा भन्नाट व्हिडीओ बनवत असतो. आता तर वॉर्नरने एक खास व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओमध्ये वॉर्नर हा धनुषच्या जागी डान्स करताना दिसत आहे. वॉर्नरचा हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला आहे. सुपरस्टार धनुष हा भारतामध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे. धनुषने साई पल्लवी या अभिनेत्रीबरोबर एका कॉमेडी सिनेमात काम केले होते. या सिनेमातील राऊडी बेबी हे गाणे चांगलेच गाजले होते. या गाण्याचा वापर आता वॉर्नरने केलेला पाहायला मिळत आहे. वॉर्नरने या गाण्याच्या व्हिडीओमध्ये आपला चेहरा लावलेला आहे. वॉर्नरने अशा पद्धतीने हा व्हिडीओ बनवला आहे की, हा तोच आहे हे ओळखता येत नाही. वॉर्नरने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. चाहत्यांना या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. काही चाहत्यांनी तर वॉर्नरला तु भारतामध्येच राहायला का येत नाहीस, अशी कमेंटही केली आहे. भारतीय चाहत्यांना वॉर्नरचा हा व्हिडीओ चांगलाच आवडला असून तो आता व्हायरल झालेला आहे. आयपीएल स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने विमानबंदी केली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हे मालदिवमध्ये काही दिवस राहीले होते. त्यानंतर १६ मे या दिवशी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मायदेशी परतले. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सिडनीमध्ये क्वारंटाइन आहेत. क्वारंटाइनचा कालावधी संपल्यानंतरच त्यांना आपल्या घरी जाता येणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3woqrTx
No comments:
Post a Comment