मुंबई: इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघाला एक दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसी आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघात निवड झालेल्या वृद्धीमान साहाने करोनावर मात केली आहे. विकेटकीपर आणि फलंदाज असलेल्या साहाचे सलग दोन टेस्ट नेगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे तो लवकरच इंग्लंडला जाणाऱ्या भारतीय संघात दाखल होईल.विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दोन जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. त्याआधी सर्व खेळाडू मुंबईत काही दिवस बायो बबलमधील राहणार आहेत. वाचा- वृद्धीमान साहाला आयपीएलच्या १४व्या हंगामात करोनाची लागण झाली होती. तो चार मे रोजी पॉझिटिव्ह झाला होता. बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याआधीच तो आयसोलेट झाला होता. इंग्लंड दौऱ्यात ऋषभ पंत भारताच विकेटकीपर असला तरी हा दौरा मोठा आहे. त्यामुळे साहाचा देखील संघात समावेश केला होता. पण तो दौऱ्यावर जाणार का ही गोष्टी त्याच्या फिटनेसवर ठरणार होती. आता साहाने करोनावर मात केल्याने तो भारतीय संघासोबत इंग्लंडला जाऊ शकतो. साहा सध्या दिल्लीत आहे. तेथून तो घरी जाणार आणि काही दिवस कुटुंबासोबत राहिल्यानंतर मुंबईत येणार असल्याचे कळते. वाचा- असा आहे भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव केएल राहुल आणि यांची निवड फिटनेसनंतर केली जाईल. असा आहे भारताचा इंग्लंड दौऱ्यातील कार्यक्रम WTC फायनल न्यूझीलंडविरुद्ध- १८ ते २२ जून (वेळ-पहाटे साडे तीन), साउथहँप्टन इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33PhM0p
No comments:
Post a Comment