Ads

Tuesday, May 25, 2021

WTC Final: भारताच्या या खेळाडूला न्यूझीलंडचा संघ घाबरतो; म्हणाले, फार धोकादायक आहे

लंडन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून साउथहॅम्पटन येथे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. या लढतीकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाची नजर आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या फायनल मॅचच्या आधी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर ते भारताविरुद्ध १८ ते २२ जून या काळात फायनल खेळतील. वाचा- न्यूझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. कर्णधार केन विलियमसनसह आयपीएलच्या १४व्या हंगामात भाग घेतलेले सर्व न्यूझीलंडच्या खेळाडूंनी सराव सुरू केला आहे. यात विलियमसनसह कायले जेमीसन, मिचेल सेंटनर, संघाचे फिजिओ टॉमी सिमसेक, प्रशिक्षक ख्रिस डोनाल्डसन यांचा समावेश आहे. भारताचा हा खेळाडू धोकादायक न्यूझीलंडचे गोलंदाजीचे प्रशिक्षक यांच्या मते, आमच्या संघाला फायनल मॅचमध्ये भारताचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतपासून सावध रहावे लागले. द टेलीग्राफशी बोलताना ते म्हणाले, पंत धोकादायक खेळाडू आहे. तो एकटा सामन्याची दिशा बदलवू शकतो. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध त्याने कशा पद्धतीने कामगिरी केली होती. पंत हा खुप सकारात्मक विचार करणारा खेळाडू आहे. पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केली होती. भारताच्या विजयात त्याची महत्त्वाची भूमिका होती. पंतने या वर्षी खेळलेल्या ६ कसोटी सामन्यात ६४.३७ च्या सरासरीने ५१५ धावा केल्या आहेत. वाचा- शेन जुरगेंसेन म्हणाले, आमच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागले आणि संयम ठेवावा लागले. पंतला अधिक धावा करण्यापासून रोखण्याचे आव्हान असेल. पंतला थांबवणे सोपे असणार नाही आणि ही गोष्ट आम्हाला लक्षात ठेवावे लागले. गोलंदाजीचे कौतुक भारतीय गोलंदाजी देखील आक्रमक आहे. ती आमच्यासाठी आव्हानात्मक असेल. गोलंदाजीत त्यांच्याकडे अनेक पर्याय आहेत. जसप्रीत बुमराह पासून ते शार्दुल ठाकूरच्या आव्हानांचा सामना आम्हाला करायचा आहे. त्याच बरोबर मोहम्मद सिराज आणि फिरकी गोलंदाज देखील आहेत. वाचा- न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलरने काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला आयपीएल स्थगित झाल्यामुळे WTC फायनलसाठी अधिक वेळ मिळाला आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2QObbjJ

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...