नवी दिल्ली: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुढील महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. या लढतीसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने चार हजार प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. हॅमशर काउंटी क्लबचे प्रमुख रॉड ब्रॅन्सग्रोव्ह यांनी याबाबतचे अपडेट दिलेत. वाचा- इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने सप्टेंबर २०१९ नंतर प्रथमच मैदानात प्रेक्षकांना देण्याची परवानगी दिली आहे. रॉड यांनी क्रिकबझला दिलेल्या माहितीनुसार, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या तिकीटांना मोठी मागणी आहे. उपलब्ध तिकिटांपैकी ५० टक्के आयसीसी आणि त्यांच्या प्रायोजक तसेच अन्य लोकांना मिळतील. तर बागीचे २ हजार तिकीटांची सर्वसामान्य लोकांना विक्री केले जाईल. आम्हाला चाहत्यांकडून दुप्पटीहून अधिक मागणी आली आहे. वाचा- करोना व्हायरसमुळे प्रवासावर मोठ्या प्रमाणात निर्बंध आहेत. आम्हाला कल्पना नाही की आयसीसी आणि बीसीसीआयचे किती सदस्य सामना पाहण्यासाठी येणार आहेत. जर सदस्य सामना पाहण्यासाठी आले नाही तर त्या तिकिटांची विक्री सामान्य प्रेक्षकांना केली जाईल, असे रॉड म्हणाले. वाचा- ब्रान्सगोव्ह भारतीय संघाचे साउथहॅम्प्टन येथे स्वागत करण्यास उत्सुक आहे. याच मैदानावर फायनल मॅच होणार आहे. या सामन्यानंतर इंग्लंश काउंटी स्पर्धेत देखील प्रेक्षकांना मैदानात प्रवेश मिळू शकतो असे ते म्हणाले. वाचा- आम्ही भारतीय संघाचा भारतातील क्वारंटाइन कालावधी संपण्याची वाट पाहत आहोत. त्याचे यजमानपद स्विकारण्यास आम्ही तयारी केली आहे, असे ही रॉड यांनी सांगितले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3v3IjmE
No comments:
Post a Comment