नवी दिल्ली: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल १८ जून रोजी इंग्लंडमधील साउथहॅम्पटन येथे होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या लढतीवर संपूर्ण जगाचे लक्ष असेल आणि चाहते देखील या लढतीची वाट पाहत आहेत. टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची चर्चे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू आहे. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू याने एक ट्विट शेअर केले असून जे खुप व्हायरल होत आहे. वाचा- जाफरने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी अंपायर कोण असावेत यासंदर्भात त्याचे मत व्यक्त केले आहे. जाफरने अंपायर रिचर्ड कॅटलबर्ग आणि कुमार धर्मसेना यांचे फोटो शेअर करून एक पोस्ट शेअर केली आहे. जाफर याच्या मते फायनल मॅचमध्ये रिचर्ड यांना अंपायरिंग दिली जाऊ नये. तर अंपायर म्हणून कुमार धर्मसेना यांना घेतले जावे. वाचा- जाफरने रिचर्ड कॅटलबर्ग यांच्या फोटोसह स्वत:चा फोटो शेअर केला आहे. ज्यात तो त्यांच्याकडे चेहरा फिरवताना दिसतोय. तर दुसऱ्या फोटोत कुमार धर्मसेना यांच्या फोटोकडे यांची निवड करावी असा इशारा देतोय. वाचा- वाचा- फायनल मॅचसाठी जाफरने कॅटलबर्ग यांना नकार आणि धर्मसेना यांना होकार का दिला असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल. तर त्याचे कारण असे की, कॅटलबर्ग यांनी जेव्हा जेव्हा भारतीय संघाच्या आयसीसी नॉक-आउट सामन्यात अंपायरिंग केली आहे तेव्हा टीम इंडियाने एकही मॅच जिंकली नाही. तर कुमार धर्मसेना यांनी २०१९च्या वर्ल्डकपमध्ये अंपायरिंग केली होती आणि न्यूझीलंडचा पराभव झाला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2QQ1KQR
No comments:
Post a Comment