मेलबर्न: भारतीय क्रिकेट बोर्डाने महिला संघाला टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचल्याचे ३ कोटी दिल्याचे वृत्त रविवारी आले होते. आता एका माजी क्रिकेटपटूने आयपीएलमध्ये खेळल्याचे पैसे १० वर्ष झाले दिले नसल्याचा आरोप केलाय. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग अशी आयपीएलची ओळख आहे. काही दिवासंपूर्वी करोनामुळे ही स्पर्धा २९ सामन्यानंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. वाचा- आता आणि पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. २०११च्या बीसीसीआयने आयपीएलमधील संघांची संख्या ८ वरून १० केली होती. यात आणि पुणे वॉरिअर या दोन संघांचा समावेश होता. एक वर्षानंतर बीसीसीआयने कोच्ची संघासोबतचा करार रद्द केला. याचे कारण होते की कोच्ची संघाने बँक हमी रक्कम दिली नव्हती. संघ व्यवस्थापनात वाद झाल्याने बीसीसीआयला पैसे मिळाले नव्हे आणि त्यामुळेच त्यांचा करार रद्द केला होता. वाचा- या संघाकडून खेळलेले असे अनेक खेळाडू होते ज्यांना अद्याप त्यांचे पैसे मिळाले नाहीत. अशा पैकी एक असलेला ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने सोमवारी थेट सोशल मीडियावर बीसीसीआयकडून मदत मागितली. वाचा- खेळाडूंना अद्याप फक्त ३५ टक्के पैसे मिळाले आहेत जे आयपीएलमध्ये १० वर्षापूर्वी कोच्ची संघाकडून खेळले. हे खेळाडू उर्वरित रक्कम मिळण्याची वाट पाहत आहेत. संबंधित पैसे मिळण्याची काही शक्यता आहे का? हे पैसे बीसीसीआय देऊ शकते का? वाचा- वाचा- हॉगला २०१०च्या आयपीएल लिलावात कोच्ची संघाने ४५२ हजार अमेरिकन डॉलरला संघात घेतले होते. १४ सामन्यात त्याने २८५ धावा केल्या होत्या. त्याची सरासरी ३५.६३ इतकी होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3i4xD3B
No comments:
Post a Comment