दुबई: श्रीलंकेविरुद्ध झालेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील विजयानंतर बांगलादेशला मोठा फायदा झाला आहे. यामुळे आयसीसीच्या वर्ल्ड कप सुपर लीगच्या गुणतक्त्यात बदल झालेत. श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकल्याने बांगलादेशचा २०२३ साली होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग सोपा झालाय. वाचा- वर्ल्ड कप सुपर लीग स्पर्धेत बांगलादेशने आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. यापैकी ५ लढतीत त्यांनी विजय मिळवला आहे. बांगलादेशकडे ५० गुण असून ते गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर आहेत. दुसऱ्या स्थानावर इंग्लंड असून त्यांच्याकडे ४० गुण आहेत. इंग्लंडने ९ पैकी ४ लढतीत विजय मिळवला आहे. पाकिस्तानचा संघ तिसऱ्या स्थानावर असून त्यांचे देखील ४० गुण आहेत. पाकने ६ पैकी ४ लढतीत विजय मिळवला आहे. वाचा- इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्या शिवाय ऑस्ट्रेलिया संघाचे देखील ४० गुण आहेत. पण त्यांचे नेट रनरेट पाकिस्तानपेक्षा कमी आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या स्थानावर आहे. वाचा- गुणतक्त्यात न्यूझीलंड, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज यांचे प्रत्येकी ३० गुण असून ते पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. भारतीय संघाने वनडे सुपरलीगमध्ये ६ सामने खेळले असून त्यापैकी ३ मध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे ते आठव्या क्रमांकावर आहेत. गुणतक्यात भारताच्या मागे झिम्बाब्वे, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदर्लंड हे संघ आहेत. वाचा- भारताचे २९ गुण असून त्यांचा एक गुण पेनाल्टीमुळे वजा करण्यात आलाय. २०२३चा वर्ल्डकप भारतात होणार असल्यामुळे या स्पर्धेत भारताला थेट प्रवेश मिळणार आहे. सुपर लीगमधील पहिल्या ८ संघांना वर्ल्डकपमध्ये थेट प्रवेश मिळेल. अन्य संघांना मुख्य स्पर्धा खेळण्यासाठी आयसीसी सुपर लीग स्पर्धेचे आयोजन करेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wPtB39
No comments:
Post a Comment