नवी दिल्ली : मुलाचे करिअर वाचवण्यासाठी वडिलांना घर सोडून जाण्याची ही पहिलीच वेळ असेल, तुमचा या गोष्टीवर विश्वास बसणरा नाही. पण ही गोष्ट घडली आहे ती भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदरच्या बाबतीत. वॉशिंग्टनचे करिअर वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनी थेट घर सोडले आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या वडिलांनी असं का केलं, जाणून घ्या...वॉशिंग्टनचे वडील एम. सुंदर यांना मुलासाठी घरं सोडलं आहे. या गोष्टीचे कारणही तेवढेच महत्वाचे आहे. वॉशिंग्टनची भारतीय संघासाठी निवड झाली आहे आणि तो १८ जूनला होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी संघाचा एक भाग असेल. त्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंना १९ मे या दिवशी मुंबईत बोलावण्यात आले आहे. तोपर्यंत खेळाडूंना आपली काळजी घ्यायची आहे. वॉशिंग्टनचे वडील एम. सुंदर हे आयकर विभागात कामाला आहेत. त्यांना आठवड्यातून तीन दिवस ऑफिसला जावे लागते. चेन्नईमध्ये सध्याच्या घडीला करोनाचे रुग्ण वाढत आहेत. या काळात एम. सुंदर यांना ऑफिमध्ये जावे लागत आहे. त्यामुळे आपल्या मुलाला करोनाची बाधा होऊ नये, यासाठी त्यांनी हा महत्वाचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत वॉशिंग्टनचे वडील एम. सुंदर म्हणाले की, " वॉशिंग्टन जेव्हापासून आयपीएल खेळून घरी आला आहे तेव्हापासून मी घरात राहत नाही. सध्या वॉशिंग्टन आणि त्याची आई एकाच घरात राहत आहेत. सध्याच्या घडीला ते दोघेही घराबाहेर पडत नाहीत. मी त्यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधतो. मला आठवड्यातून तीन वेळा ऑफिमध्ये जावे लागते. त्यामुळे मला वाटते की, माझ्यामुळे वॉशिंग्टनला कोणताही धोका पोहोचता कामा नये." भारतीय संघात वॉशिंग्टनची इंग्लंडच्या दौऱ्यासाठी निवड झाली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये १८ जूनला इंग्लंडमध्ये विश्व अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. या सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आलेला आहे. भारताच्या संघातील सर्व अनुभवी खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आता हा सामना कोण जिंकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2RtexJd
No comments:
Post a Comment