नवी दिल्ली : आयपीएलचा स्टार फलंदाज नितिष राणाचा एक व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राणाबरोबर त्याची बायकोही आहे. हे दोघे हॉटेलच्या रुमममध्ये असून यावेळचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यावर्षी आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून राणाने धडाकेबाज फलंदाजी केली होती. सलामीला येऊन राणा धडाकेबाज फटकेबाजी करायला आणि केकेआसाठी धावा जमवायचा. पण मैदानाबाहेरही राणाचा चांगलाच प्रसिद्ध होताना दिसत आहे. सोशल मीडियावर तर त्याच्या बायकोबरोबरचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला आहे. हा व्हिडीओ आयपीएल सुरु असतानाचा आहे. या व्हिडीओमध्ये राणा आणि त्याची पत्नी साची मारवाह आहे. या व्हिडीओमध्ये साचीने राणाला आपल्या पाठीवर बसवले असून ती व्यायाम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. राणा यावेळी केकेआरच्या जर्सीमध्ये दिसत आहे. साचीने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रावर पोस्ट केला आहे. चाहत्यांना हा व्हिडीओ चांगलाच पसंत पडला आहे आणि चाहत्यांनी यावर आपल्या कमेंट्सही लिहिल्या आहेत. काही चाहत्यांनी तर राणा पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये ५०० पेक्षा जास्त धावा करेल, असेही म्हटले आहे. यावर्षीची आयपीएल करोनामुळे स्थगित करण्यात आली आहे. पण आयीपएलचे अजूनही ३१ सामने बाकी आहेत. त्यामुळे हे ३१ सामने आता कधी आणि कुठे खेळवणार, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/342AaCP
No comments:
Post a Comment