नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार याच्या हेलीकॉप्टर शॉटची अनेक जण कॉपी करताना दिसतात. धोनीच्या या शॉटचे आज देखील चाहते वाट पाहत असता. जेव्हा जेव्हा एखादा फलंदाज असा शॉट मारतात तेव्हा तेव्हा धोनीचे नाव निघते. वाचा- धोनीचा मारताना काही जण यशस्वी ठरतात तर काही जण अपयशी ठरताना दिसतात. इंग्लंडमध्ये सध्या काउंटी क्रिकेट चॅम्पियनशिप सुरू आहे. या स्पर्धेतील एसेक्स आणि डर्बीशायर यांच्यात झालेल्या सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- डर्बीशायरने टॉस जिंकून प्रथम एसेक्सला फलंदाजीकरण्यास बोलवले. एसेक्सने पहिला डाव ३ बाद ४१२ धावांवर घोषित केला. त्यांच्याकडून डॅन लॉरेंन्सने १३३ चेंडूत नाबाद १५२ धावा केल्या. यात १६ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. तो जेव्हा १४७ धावांवर फलंदाजी करत होता, तेव्हा ७६व्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर धोनीप्रमाणे हेलीकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. वाचा- जुंपली लॉरेन्सने फिरकीपटू मॅट ख्रिचलीच्या चेंडूवर हेलीकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न केला पण तो क्रीझवरच पडला. धोनीच्या प्रमाणे त्याला परफेक्ट हेलीकॉप्टर शॉट मारता आला नाही. धोनीने मारलेला चेंडू सीमेबाहेर जायचा. लॉरेंन्सचा चेंडू देखील बाहेर गेला पण त्याला षटकारा ऐवजी चौकारावर समाधान मानावे लागले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- डर्बीशायरने पहिल्या डावात १४६ धावा केल्या. दुसऱ्या डावात त्यांना २५१ धावा करता आल्या. या सामन्यात एसेक्सने डर्बीशायरला एक डाव आणि १५ धावांनी पराभूत केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2SXeFRR
No comments:
Post a Comment