दुबई: बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका झाली. मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे लढतीत श्रीलंकेने विजय मिळवला पण ही मालिका बांगलादेशने २-१ने जिंकली. वाचा- अखेरच्या लढतीत बांगलादेशकडून पुन्हा एकदा जंटलमन्स गेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेळाला काळीमा लावला गेला. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वर्ल्ड कप सुपर लीग सीरिजमधील अखेरच्या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार याला अभद्र भाषा वापरल्याबद्दल दंड करण्यात आला. आयसीसीने त्याला मॅच फ्रीच्या १५ टक्के इतका दंड (४५ हजार रुपये) केलाय. आयसीसीची आचार संहितेच्या कलम २.३ चे उल्लंघन केल्याप्रकरणी इकबालला दोषी ठरवण्यात आले. या शिवाय त्याला एक नकारात्मक गुण देखील देण्यात आला. गेल्या २४ महिन्यांच्या कालावधीतील ही त्याची पहिली चूक आहे. वाचा- अखेरच्या लढतीत बांगलादेशच्या डावातील १०व्या षटकात तमीमने विकेटच्या मागे कॅच घेतला. यासाठी त्यांनी रिव्ह्यू घेतला ज्यात त्यांच्या बाजूने निकाल लागला नाही. त्यानंतर इकबालने अभ्रद्र भाषेचा वापर केला. सामनाधिकारी नेयामुर राशिद यांनी इकबालला शिक्षा सुनावली, त्याने ती चूक मान्य केली. त्यामुळे या प्रकरणाची औपचारिक सुनावणी झाली नाही. वाचा- बांगलादेशच्या खेळाडूंकडून या मालिकेत झालेली ही पहिली चूक नाही. याआधी दुसऱ्या वनडे फिकेटकीपर आणि फलंदाज मुशफिकुल रहीमने गोलंदाज मेहदी हसन मिराजला नॉन स्ट्रायकल बाजूकडील फलंदाज तुझ्या मधे आले तर त्याला धक्का देऊन जमीनीवर पाड असा सल्ला दिला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3yGUxnr
No comments:
Post a Comment