मुंबई: भारतात या वर्षी होणाऱ्या संदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने एक खास जनरल मीटिंग (SGM) बोलावली आहे. २९ मे रोजी होणाऱ्या या ऑनलाइन बैठकीत १ जून रोजी होणाऱ्या आयसीसीच्या नियोजित बैठकीसंदर्भात देखील चर्चा होऊ शकते. वाचा- एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आयसीसीच्या बैठकी आधी स्वत:ची भूमिका आणि नियोजन तयार करण्याचा विचार करत आहे. करोनाच्या सध्याच्या परिस्थितीत आणि प्रोटोकॉलमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वर्ल्डकपच्या आयोजनासंदर्भात चर्चा होणार आहे. वाचा- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने टी-२० वर्ल्डकपसाठी ९ शहरांची निवड केली आहे. यात अहमदाबाद, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ आणि धर्मशाळा यांचा समावेश आहे. भारतातील सध्याची करोना परिस्थिती पाहता आयसीसी टी-२० वर्ल्डकपबाबत अंतिम निर्णय घेणार आहे. वाचा- आयसीसीचे पथक २६ एप्रिल रोजी दिल्ली येणार होते. हे पथक आयपीएलच्या बायो बबलचे निरिक्षण करणार होते. पण भारतावर लागलेल्या प्रवास बंदीमुळे हा दौरा स्थगित करण्यात आला. बीसीसीआयच्या बैठकीत टी-२० वर्ल्डकप सोबतच आंतरराष्ट्रीय वेळापत्रक, महिला क्रिकेट याबाबत देखल चर्चा होणार आहे. भारताकडे आहे दुसरा पर्याय जर भारताला टी-२० वर्ल्डकपचे आयोजन करता आले नाही तर युएई हा दुसरा पर्याय असेल. या वर्षी १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात टी-२० वर्ल्डकपचे आयोजन नियोजित आहे. बीसीसीआयने गेल्या वर्षी संयुक्त अमीरात क्रिकेट बोर्डासोबत एक करार केला आहे. या करारानुसार टी-२० वर्ल्डकप भलेही युएईमध्ये झाला तरी त्याच्या नियोजनाची जबाबदारी बीसीसीआयची असेल. त्याच बरोबर स्पर्धेचे सर्व अधिकार बीसीसीआयकडेच असतील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tUb0AY
No comments:
Post a Comment