नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने वनडे क्रिकेट आणखी रोमांचक करण्यासाठी वर्ल्डकप सुपर लीगची सुरूवात केली. यामध्ये द्विपश्रीय वनडे मालिकांचे आयोजन वनडे वर्ल्डकप सुपर लीगच्या पद्धतीने आयोजित केले जात आहेत आणि त्याचा गुणतक्ता देखील तयार केला जातोय. वाचा- आयसीसीच्या वर्ल्डकप सुपर लीगच्या गुणतक्त्यात कमकूवत मानल्या जाणाऱ्या बांगलादेश क्रिकेट संघाने अव्वल स्थान मिळवले आहे. बांगलादेशचा संघ ५० गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर प्रत्येकी ४० गुणांसह तीन संघ दुसऱ्या स्थानावर आहेत. बांगलादेश संघाने अधिक सामने खेळले म्हणून ते पहिल्या स्थानावर पोहोचलेत असे नाही. त्यांनी आतापर्यंत फक्त ८ सामने खेळले असून त्यापैकी ५ मध्ये विजय मिळवला आहे. वर्ल्डकप सुपर लीगमध्ये सर्वाधिक ९ सामने इंग्लंडने खेळले आहेत. पण त्याच ५ लढतीत पराभव झालाय. वाचा- गुणतक्यात बांगलादेश अव्वल, इंग्लंड दुसऱ्या, पाकिस्तान ६ पैकी ४ विजयासह तिसऱ्या, ऑस्ट्रेलिया ४० गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पाचव्या स्थानावर न्यूझीलंड असून त्यांनी ३ लढती जिंकल्या आहेत. तर तीन विजयासह अफगाणिस्तान सहाव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज सातव्या तर भारत आठव्या स्थानावर आहे. वाचा- वर्ल्डकप सुपर लीग गुणतक्ता बांगलादेश- ५० गुण इंग्लंड- ४० गुण पाकिस्तान- ४० गुण ऑस्ट्रेलिया- ४० गुण न्यूझीलंड-३० गुण अफगाणिस्तान- ३० गुण वेस्ट इंडिज- ३० गुण भारत- २९ गुण झिम्बब्वे- १० गुण आयर्लंड- १० गुण दक्षिण आफ्रिका- ९ गुण श्रीलंका- वजा २ गुण
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uoVYU5
No comments:
Post a Comment